भिवापूर :-पो.स्टे. भिवापूर अंतर्गत ०.३ किमी अंतरावर भिवापूर येथे दिनांक १८/४/२०२३ चे ०२/३५ वा. पर्यंत पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ हे पोलीस स्टेशन भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना खास मुकविरव्दारे माहिती मिळाली की एक अवैधरीत्या विनापरवाना टिप्परमध्ये रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून भिवापूर पोलीस स्टाफ यांनी नाकाबंदी दरम्यान निलज कडुन नागपुर कडे जाणारा टिप्पर ट्रक क्र. एम. एच. ३६ / ए.ए- १९९२ वा चालक आरोपी नामे- गिरीधर भद्रीनाथ कुंभरे वय ३६ वर्ष रा हनुमान मंदीर जवळ खापा त जि भंडारा त्यास थांबवुन चेक केले असता सदर टिप्पर मध्ये रेतीचा लोड भरलेला दिसल्याने सदर चालकास रॉयल्टी बाबत विचारले असता चालकाने रेतीची रॉयल्टी नसल्याचे सांगितले सदर टिप्परमध्ये ६ ब्रास रेती किंमती अंदाजे ५०००/- रू. बास प्रमाणे एकुण ३०,०००/- ची रेती तसेच टिप्पर ट्रक क्र. एम एवं ३६ एए -१११२ किंमती अंदाजे २०,००,०००/- रु असा एकूण २०,३०,००० /- रूपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे- किशोर रतपालसिंह ठाकुर, वय ४९ वर्ष पोलीस स्टेशन भिवापुर यांचे रीपोर्टवरून पोलीस स्टेशन भिवापूर येथे आरोपीविरूद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा / ९२४ प्रविन जाधव हे करीत आहे.