पोलीस स्टेशन कन्हान अंतर्गत दिनांक २९/१०/२०२४ रोजी सकाळी ८/३० वा. ते ०९/१५ वा. पर्यंत डॉ. संतोष गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग यांचे उपस्थितीत सार्वत्रीक विधानसभा निवडणुक २०२४ संबंधाने रुट मार्च घेण्यात आला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व तारसा चौक येथे स्थानिक नागरीकांसोबत संवाद साधुन त्यांना निवडणुक संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले व त्यांना निवडणुक कशी शांततेत पार पडेल या वावत चर्चा करण्यात आली.
पोलीस स्टेशन कन्हान ते डॉ. बावासाहेब आंबेडकर चौक ते तारसा चौक ते नाका नं. ७ ते गांधी चौक ते पोलीस स्टेशन कन्हान पर्यंत घेण्यात आला. सदर रुट मार्च मध्ये ३ अधिकारी ८ अंमलदार व IITBP चे १ अधिकारी व २० अंमलदार हजर होते.
पोलीस स्टेशन काटोल येथे आज रोजी वापु रोहोम उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नी. मेश्राम ठाणेदार काटोल, ५ अधिकारी, १५ अंमलदार, १३ सि.आर.पि.एफ. १६ एस.एस. वि.चे जवान सह रॅली मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समिती, बस स्टॉप, आंबेडकर चौक, तहसील कार्यालय येथे रुट मार्च घेण्यात आला.
पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत दिनांक २९.१०.२०२४ रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ संबंधात रूटमार्च घेण्यात आला. सदर रूटमार्च पोलीस स्टेशन ते गांधी चौक राजकमल चौक बस स्टॅन्ड गांधी चौक तहसील कार्यालय शिवाजी बौक परत पोलीस स्टेशन पर्यंत रूट मार्च अनिल म्हस्के सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर विभाग सावनेर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच उपस्थितीमध्ये घेण्यात आलेला आहे.