गांजा तस्करी करणारे आरोपी १८ किलो ७०० ग्रॅम गांजासह गजाआड

– पोलीस स्टेशन उमरेड यांची कारवाई

उमरेड :- दिनांक १०/०९/२०२३ रोजी पो.स्टे. उमरेड येथील गुन्हे प्रकटीकरण पथकास खात्रीशिर गुप्त माहीती मिळाली कि, दोन इसम हे बायपास चौक परीसरात दोन कथ्या रंगाच्या बॅगमध्ये गांजा पदार्थ घेवून बाळगून संशयास्पद रित्या फिरत आहे. अशा सूचनेवरून वायपास चौक व आजुबाजुच्या परीसरात दिलेल्या वर्णनाच्या इसमांचा शोध घेतला. असता मोहपा रोड उमरेड येथे दोन इसम कथ्या रंगाच्या बॅगसह संशयास्पदरित्या मिळुन आले. सदर दोन्ही ईसमांना ताब्यात घेवून त्यांचे नाव विचारले असता त्यांनी आपले नाव १) रौनक देवनाथ शिंपी वय १९ वर्ष, रा. येरकड ता. धानोरा जि. गडचिरोली २) आदित्य विकास वाघमारे वय २२ वर्ष रा. येरकड ता. धानोरा जि. गडचिरोली असे सांगीतले. दोन्ही ईसमांच्या ताब्यात असलेल्या दोन कच्या रंगाच्या बॅग तपासले असता त्यामध्ये एकून १८ किलो ७०० ग्राम गांजा अंदाजे किंमती ३,७४,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन्ही इसमाकडून सदर मुददेमाल जप्ती पंचनाम्या प्रमाणे पंचासमक्ष एन. डी. पी. एस. कायदयातील सर्व आवश्यक तरतुदीचे पालन करून जप्ती पंचनाम्या नुसार जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपीताविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेण्यात आला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक डॉ. सदिप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग उमरेड राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे सोबत पोउपनि दिनेश खोटेले पोहवा प्रदिप चवरे, पोना राधेशाम कांबळे, पंकज बटटे, पोना रमेश खरकाटे, पोशि गोवर्धन सहारे पोशि भागवत गुटटे सर्व पो.स्टे. उमरेड यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पळवून नेणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल

Mon Sep 11 , 2023
एमआयडीसी बोरी :- फिर्यादीची मुलगी ही इयत्ता १२ वी मध्ये शिकत असून घरून सकाळी ०७.०० वा. गार्डन चौक येथून स्टार बस पकडुन कॉलेजला जाते व दुपारी १२.३० वा. परत येते. दिनांक ०९/०९/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वा. ती घरून कॉलेजला गेली व १२.३० वा. घरी परत आली नाही. दुपारी ०३.३० वा. दरम्यान फिर्यादीने तिची मुलगी हिला फोन केले असता फोन बंद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com