अवैधरित्या गांजा सेवन करणाऱ्या चार आरोपींवर गुन्हा दाखल..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 29 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कमसरी बाजार मालमशाह दरगाह मागे अवैधरित्या गांजा बाळगुन गांज्याचे सेवन करीत असता पोलिसांनी वेळीच धाड घालून त्या चारही गांजा सेवन करणाऱ्याना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याजवळून चिलम,माचीस च्या काड्या,कापडी चिंधी,आदि जप्त करून त्याच्याविरुद्ध भादवी कलम 27,29 एनडीपीएस कायदा 1985 अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आल्याची कारवाही सायंकाळी 5 दरम्यान केली असून आरोपीचे नाव जफर कुरेशी वय 25 वर्षे,रा भाजी मंडी कामठी,युनिस खान दाऊद खान वय 61 वर्षे रा सैलानी नगर कामठी,जुबेर कुरेशी जब्बार कुरेशी वय 21 वर्षे रा बकरा कमेला कामठी व साहिल शेख हबीब शेख वय 24 वर्षे रा कमसरी बाजार कामठी असे आहे.

ही यशस्वी कारवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे,पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या मार्गदर्शनार्थ पोलीस उपनिरीक्षक श्याम वारंगे, ठाकूर, अनुप, निलेश यादव,राठोड, पांडे, रोशन आदींनी केली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com