– स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण यांची कारवाई
कोंढाळी :- पोलीस स्टेशन कोंढाळी येथे दिनांक २८/०७/२०२३ चे १०.०० वा. ते दिनांक ०३/०८/२०२३ मे १७. ०० वा. दरम्यान फिर्यादी नामे- साधना हनुमंतराव वाघ, वय ५३ वर्ष, रा. उमरी वाहता. हिंगणा जि. नागपुर यांची आईची प्रकृती खराब असल्याने फिर्यादी आपले पतीसह नागपुर येथे गेले होते व दिनांक ०३/०८/२०२३ रोजी नागपुर वरून उमरी वाच येथे पतीसह परत आले. तेव्हा फिर्यादी यांना आपल्या घरची निशानी (शिडी) बाथरूमच्या स्लॅपला लावलेली दिसली फिर्यादी यांना वाटले की, कोणी नेली असेल व आणून ठेवली आहे यावरून फिर्यादी यांनी लक्ष दिले नाही. घराचे दरवाजा उघडुन आत प्रवेश केला असता घराची कवेल काढलेली व ताडपतरी निघलेली दिसली. फिर्यादी यांनी आलमारीला लॉक लावण्याचे विसरले होते. आलमारी उमडुन बगीतले असता फिर्यादीचे १) सोन्याच्या बांगडया वजन ५ तोळे ०२) सोन्याचे टॉप्स वजन २५ ग्रॅम, .३) मोत्याचा दोन कुडया आलमारी मध्ये डव्यामध्ये दिसले व बाकीचे सोन्याचे दागीने ०१) दोन तोळे कंठी ०२) सोन्याचे मंगळसूत्र वजन ३ तोळे ०३) सोन्याची अंगठी वजन १ तोळा ०४) सोन्याची अंगठी प्रत्येकी वजन ५ ग्रॅम एकुण १० ग्रॅम सोन्याचे दागीने फिर्यादीचा दिरचा मुलगा नामे प्रज्वल वाघ हा फिर्यादी घरी हजर नसतांना शिडीच्या मदतीने घरात प्रवेश करून घरातील कपाटातील ७ तोळे वजनाचे सोने चोरून नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे. अप क्र. ५९१/२३ कलम ४५७, ३८०. भादवि अन्वयेचा गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्हयाचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखा येथील पथक पोस्टे कोंढाळी परिसरात पेट्रोलिंग करीत असता घरफोडी गुन्ह्यात आरोपी यांचा शोध घेत असता मिळालेल्या गुप्त माहिती वरून सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. १) प्रज्वल गुणवंत वाघ, वय २२ वर्ष रा. तूकड़ोजी पुतळा नागपूर यास अजनी नागपूर येथून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली असता गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल आरोपी क्र. २) हाराधान गणेश घोष वय ४३ वर्ष रा. महल तुलसीबाग नागपूर यास विकल्याचे सांगितल्याने आरोपी क्र. २) कडून ३० ग्रॅम सोन्याची लगड किंमती अंदाजे १,८०,०००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असा वरील प्रमाणे मुद्देमाल आरोपी क्र. २ यांचेकडून जप्त करून दोन्ही आरोपीतांची मेडिकल तपासणी करून जप्त मुद्देमाल व आरोपीसह पुढील तपास कामी पो.स्टे. कोंढाळी यांचे ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) विशाल आनंद सर (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष ठाकुर, पोलीस हवालदार प्रमोद तभाने, अरविंद भगत, आशिस भुरे, रणजित जाधव, पोलीस शिपाई राहुल साबळे, निलेश इंगुलकर वाहन चालक पोलीस शिपाई आशुतोष लांजेवार यांनी पार पाडली.