नागपूर येथील हनी ट्रॅपद्वारे खंडणी वसुल करणारी टोळी गडचिरोली पोलीस दलाच्या ताब्यात..

 

आरोपीतांमध्ये 01 पत्रकार व 01 पुरुष पोलीस अंमलदार यांचा समावेश..

 गडचिरोली – दिनांक 29/01/2024 रोजी पोस्टे गडचिरोली येथील एक शासकिय कार्यालयामध्ये कार्यरत अभियंता यांनी तक्रार दिली की, दिनांक 03/01/2024 रोजी ते शासकिय कामाने नागपूर येथे गेले असता, यातील आरोपी फिर्यादीचा जुना मित्र सुशील याने हिंगणा, नागपूर येथील हॉटेल मध्ये त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करुन दिल्याने फिर्यादी तसेच दोन महिला आरोपी रुममध्ये थांबले असता, महिला आरोपी हिने फिर्यादीवर बलात्काराचा खोटा आरोप लावुन त्यांच्याकडुन पैशाची मागणी केली. तसेच घटनाक्रमाचे दरम्यान आरोपी सुशील (पोलीस कर्मचारी, नागपूर शहर) याने आरोपी रवीकांत कांबळे (पत्रकार, रा. नागपूर) यास 28,000/- रुपये तसेच 2 ते 3 लाख रुपये नगदी पेड केले असल्याचे भासविले असता, सर्व आरोपीतांनी संगणमताने बेकायेदेशिरित्या गुन्हेगारी स्वरुपाचा कट कारस्थान रचुन फिर्यादीवर बलात्कार केल्याचा व त्यामुळे महिला आरोपी गरोधर राहीली आहे असा खोटा आरोप लावुन बलात्काराचा गुन्हा दाखल करुन फिर्यादीची जनमानसात बदनामी करण्याची भिती घालुन हे प्रकरण मिटविण्यासाठी 10 लाख रुपये पैशांची मागणी करुन पैसे देण्यास फिर्यादीवर जबरदस्ती केली असल्याच्या तोंडी रिपोर्ट वरुन अप क्र. 60/2024 कलम 384, 389, 120 (ब) भादवि अन्वये पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्राचे गांभीर्य लक्षात घेऊन  पोलीस अधीक्षक,  नीलोत्पल  यांनी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व कर्मचारी यांना सदर आरोपीतांचा शोध घेण्याबाबत निर्देशित केले. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले असता, गुन्हा दाखल होऊन अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर शहर गुन्हे शाखा पथकच्या मदतीने गोपनिय सुत्रधारांकडुन खात्रीशिर माहिती घेऊन अतिशय शिताफीने आरोपींचा ठावठिकाणा शोधुन गुन्ह्रातील आरोपी नामे 1) सुशील , रा. हिंगणा, नागपूर, 2) रवीकांत कांबळे रा. नागपूर, 3) रोहित अहिर रा. सुभाषनगर, नागपूर 4) ईशानी रा. नागपूर यांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशिर कारवाईस्तव पोलीस स्टेशन गडचिरोली यांचे ताब्यात दिले. तसेच एक महिला आरोपी ही फरार असून तिचा शोध घेणे सुरु आहे. वरील सर्व आरोपी यांना गडचिरोली पोलीसांनी आज संध्याकाळी अटक केली आहे. सदर गुन्ह्राचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पो.नि. अरुण फेगडे हे करत आहेत. .

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता  व उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली मयुर भुजबळ यांचे मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोनि. अरुन फेगडे यांचे नेतृत्वात स्था.गु.शा. गडचिरोलीचे सपोनि. राहुल आव्हाड, पोहवा./अकबर पोयाम, मपोहवा/लक्ष्मी विश्वास, मपोअं/वालदे, पोअं/बोईनार, पोअं/परचाके, पोअं/प्रशांत गरुफडे, चापोहवा/1681 मनोहर तोगरवार चापोना/माणिक निसार, चापोअं/दिपक लोणारे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

खासदार औद्योगिक महोत्सव गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीचे व्यासपीठ ठरले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Tue Jan 30 , 2024
– तीन दिवसीय महोत्सवाचा समारोप* नागपूर :- विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग यावे, गुंतवणूक व्हावी यासाठी खासदार औद्योगिक महोत्सव हा मैलाचा दगड ठरला आहे. या महोत्सवात अनेक उद्योजक सहभागी झाले. या माध्यमातून विदर्भात आपण गुंतवणूक करू शकतो, हा विश्वास उद्योजकांमध्ये निर्माण झाला आहे. हा महोत्सव गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी व्यासपीठ ठरले असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!