गडचिरोली : विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधान परिषद अंबादास दानवे हे रविवार, दि.12 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे मुक्कामी येणार आहेत. सोमवार, दि.13 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची भेट व चर्चा करणार आहेत. त्यानंतर मोटारीने कोनसरी एम.आय.डी.सी.,ता. चामोर्शी जि. गडचिरोलीकडे प्रयाण व कोनसरी फिल्टर प्लॉन्टची पाहणी व संबंधित अधिकाऱ्यासमवेत चर्चा करणार आहेत.