रिधोरा येथे ज्येष्ठ मंडळाची स्थापना 

– संतोष डांगोरे अध्यक्ष , उपाध्यक्ष गुणवंतराव कीटूकले तर सचिव वसंतराव धवड म्हणून यांची निवड

– ज्येष्ठ नागरिकांमध्ये उत्साह

– विरंगुळा सेंटर साठी जेष्ठ नागरिक मंडळाची आग्रही भूमिका

काटोल :- ज्येष्ठ नागरिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा दिवसेंदिवस बदलत चाललेला आहे ज्येष्ठ नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो त्यांच्या सांस्कृतिक सामाजिक व आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन रिधोरा शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी गावात जेष्ठ नागरिकांसाठी एक हक्काचे व्यासपीठ असावे याकरिता ज्येष्ठ नागरिकांचे मंडळ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला व बुधवार ला ज्येष्ठ नागरिकांची सभा बोलवून त्यांच्यातूनच ज्येष्ठ नागरिकांची कार्यकारीणीची निवड केली यामध्ये संतोष डांगोरे अध्यक्ष तर गुणवंत किटुकले उपाध्यक्ष व सचिव म्हणून वसंत धवड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली उपस्थिततांना प्रशांत पवार यांनी संबोधित केले व ज्येष्ठ नागरिकांची गावागावात गरज काय ते पटऊवून दिले तसेच रिधोरा शेतकरी कृती समितीचे उपाध्यक्ष टिळकराव टालाटूले यांनी मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नागरिक मंडळ सभासदांमध्ये शेषराव उमाळे, शामराव तमाने, शामराव गंगाराम तभाने, किसनराव टेकाडे, शेषराव वरोकर, जनार्दन तांबूसकर, बबनराव वाघमारे, रामभाऊ निगुट, नामदेवराव काठोळे, वसंतराव धवड, रामराव डांगोरे, दिगंबर तभाने, पुंडलिकराव हेलोंडे, विठ्ठल उमाळे, पांडुरंग काळे, मधुकर तभाने, टिळकराव टालाटुले, रामभाऊ मोहोड, आदी सभासदांची नोंद घेण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमर खोडे, सुभाष ईरखेडे, कांतेश्वर दोरवे, दत्तराज दोरवे, बंडू खोडे, भाऊसाहेब पवार, संदीप पवार, उमेश डांगोरे, जनार्दन पवार यासह गावकऱ्यांनी मदत केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्रधान नियंत्रक रक्षा लेखा (दक्षिण कमान), पुणे की मेजर जनरल संजय कुमार विद्यार्थी से मुलाक़ात

Thu Sep 28 , 2023
नागपूर :- डॉ. राजीव एस चव्हाण,भा.र.ले.से, एनडीसी, प्रधान नियंत्रक रक्षा लेखा (दक्षिण कमान), पुणे ने सोमवार को मेजर जनरल संजय कुमार विद्यार्थी, एवीएसएम, जनरल ऑफिसर कमांडिंग, उत्तर महाराष्ट्र और गुजरात सब एरिया, नागपुर से मुलाकात की। जीओसी के साथ बैठक के दौरान, डॉ. चव्हाण ने एकीकृत वित्तीय सलाह (आईएफए) प्रणाली के एक प्रभावी तंत्र को मानकीकृत करने और प्रणाली को […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com