पूरग्रस्तांसाठी भाजपा वैद्यकीय आघाडीद्वारे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

नागपूर :- नागपुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरग्रस्त भागामध्ये झालेल्या गंभीर आजारांपासून स्थानिक नागरिकांच्या स्वस्थ आरोग्यासाठी भाजपच्या वैद्यकीय आघाडीद्वारे नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात, तर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे, संदीप जोशी, आमदार प्रवीण दटके, यांच्या नेतृत्वात सूदामपुरी वर्मा ले आउट या परिसरात आजपासून आयोजित करण्यात आले. या आरोग्य शिबिरात मुसळधार पावसाने पीडित रहिवास्यांना भाजप वैद्यकीय आघाडी व न्यू ऐरा हॉस्पिटल च्या डॉक्टर्स द्वारे मोफत वैद्यकीय मार्गदर्शन, औषधी वाटप, नेत्र तपासणी, डायग्नो प्लस द्वारे रक्त तपासणी आदी आरोग्य सुविधांचे नियोजन करण्यात येत आहे. या भागात आज भाजप शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांच्या नेतृत्वात शहर महामंत्री अश्विनी जिचकार, भाजप पच्छीम मंडळ अध्यक्ष विनोद कान्हेरे, दक्षिण पच्छिम अध्यक्ष  रितेश गावंडे , नगरसेविका परिणिता फुके आणि स्थानिक भाजप पदाधिकारी यांचे सहकार्याने शिबिर आयोजित होत असून भाजप वैद्यकीय आघाडी द्वारे डॉ गिरीश चर्डे, डॉ श्रीरंग वराडपांडे ,डॉ रोहित राखुंडे, डॉ अंकित भांगे, राकेश कोणतंवर, डॉ सारंगपुरे, डॉ रामेश्वर, आणि वैद्यकीय डॉक्टर्स टीम विशेष सेवा प्रदान करत आहेत. या आठवड्यात सूदामपुरी वर्मा ले आउट, पांढराबोडी, अंबाझरी, डागा ले आउट , सुरेंद्रगढ , नंदनवन झोपडपट्टी, अशा अनेक पूरग्रस्त भागात निःशुल्क आरोग्य शिबिरांचे आयोजन होणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

डिजिटल माध्यमाने हिंदी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले - प्रा. डॉ. मोना चिमोटे

Thu Sep 28 , 2023
– आयआयएमसीत हिंदी पंधरवाडा निमित्य विविध कार्यक्रम अमरावती :- डिजिटल माध्यमाने हिंदी भाषेला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हिंदी भाषेचे भवितव्य उज्ज्वल असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हिंदी रोज नव्या आयामांना स्पर्श करीत आहे असे मत प्रा. (डॉ.) मोना चिमोटे यांनी आयआयएमसीत आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले . भारतीय जन संचार संस्थानच्या पश्चिम क्षेत्रीय परिसरातर्फे हिंदी भाषा दिनानिमित्य दिनांक १४ ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!