खोबा येथील अपघातात चौघांचा मृत्यू तर दोन जख्मी

अमरदिप बडगे, प्रतिनिधी 

गोंदिया –  जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील नवेगाव व भजियापार येथे काल रात्री 11 सुमारास नवेगावबांध येथून कृषी सोलर पंप फिटिंग करून कामावरून घरी परत जातांनी नवेगावबांध कोहमारा मार्गावरील खोबा या गावात चार चाकी वाहनाचा तोल बिघडून नवेगाव येथील तीन व भजियापार येथील एका युवकाचा दुखद मृत्यू झाला असुन इतर दोघे जखमी झाले आहेत.
मृतकांमध्ये चिरंजीव रामकृष्ण योगराज बिसेन वय 24 वर्ष, चिरंजीव सचिन गोरेलाल कटरे वय 24 वर्ष, चि. संदीप जागेश्वर सोनवाने वय 18 वर्ष सर्व नवेगाव तालूका आमगाव आणि भजीयापार निलेश तुरकर वय 27 वर्ष यांचा समावेश आहे .तर जखमींमध्ये नवेगाव येथील प्रदिप कमलेश बीसेन वय 24 वर्ष व मधुसूदन नंदलाल बिसेन वय 24 वर्ष यांचा समावेश असून त्यांना उपचारार्थ गोंदियाला हलविण्यात आले आहे .
चारही मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले .सदर घटनेचा कलम 174 जा. फो. नुसार नोंद करून पुढील तपास डुगीपार पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत .
घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्या रचना गहाणे , पं. स. उपसभापती होमराज पुस्तोडे , उपसरपंच रघूनाथ लांजेवार , नवल चांडक आदिंनी भेट देवून सदर घटनेबद्यल दु:ख व्यक्त करून विशेष सहकार्य व नातेवाईकांचे शांतवन केले .सदर घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी नगर परिषदचे ओबीसी आरक्षण सोडत जाहीर

Thu Jul 28 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी – आरक्षण सोडतीत ओबीसी आरक्षणानुसार 6 जागा ओबीसी च्या वाट्याला आल्या कामठी ता प्र 28 :- कामठी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला)व सर्वसाधारण (महिला )आरक्षण सोडतिचा सुधारित कार्यक्रम अंतर्गत आज 28 जुलै ला सकाळी 11 वाजता कामठी तहसील कार्यालयात कामठी नगर परिषद चे प्रशासक व एसडीओ श्याम मदनूरकर व मुख्याधिकारी संदीप […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com