अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया – जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील नवेगाव व भजियापार येथे काल रात्री 11 सुमारास नवेगावबांध येथून कृषी सोलर पंप फिटिंग करून कामावरून घरी परत जातांनी नवेगावबांध कोहमारा मार्गावरील खोबा या गावात चार चाकी वाहनाचा तोल बिघडून नवेगाव येथील तीन व भजियापार येथील एका युवकाचा दुखद मृत्यू झाला असुन इतर दोघे जखमी झाले आहेत.
मृतकांमध्ये चिरंजीव रामकृष्ण योगराज बिसेन वय 24 वर्ष, चिरंजीव सचिन गोरेलाल कटरे वय 24 वर्ष, चि. संदीप जागेश्वर सोनवाने वय 18 वर्ष सर्व नवेगाव तालूका आमगाव आणि भजीयापार निलेश तुरकर वय 27 वर्ष यांचा समावेश आहे .तर जखमींमध्ये नवेगाव येथील प्रदिप कमलेश बीसेन वय 24 वर्ष व मधुसूदन नंदलाल बिसेन वय 24 वर्ष यांचा समावेश असून त्यांना उपचारार्थ गोंदियाला हलविण्यात आले आहे .
चारही मृतदेहाची उत्तरीय तपासणी ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे करून मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आले .सदर घटनेचा कलम 174 जा. फो. नुसार नोंद करून पुढील तपास डुगीपार पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहेत .
घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्या रचना गहाणे , पं. स. उपसभापती होमराज पुस्तोडे , उपसरपंच रघूनाथ लांजेवार , नवल चांडक आदिंनी भेट देवून सदर घटनेबद्यल दु:ख व्यक्त करून विशेष सहकार्य व नातेवाईकांचे शांतवन केले .सदर घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .