अमरदिप बडगे
गोंदिया – सागवन तस्करी करतांना तोतया पत्रकारासोबत चार आरोपीला देवरी वनविभागाने अटक केल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या देवरी-चिचगड मार्गावर घडली असून आरोपी कडून तब्बल 5 लाख रूपयांचे सागवन जप्त केले आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन संपदा आहेत. त्यातही सागवान वृक्षाचे फार मोठ्या प्रमाणात तस्करी होताना दिसत असते. दरम्यान वन विभाग तस्करी थांबविन्यासाठी पेट्रोलिंग वर असताना रात्री तपासणी दरम्यान एका चार चाकी वाहन( क्रमांक MH 31 CN 0422) 23 नग सागवान चिरान ज्याची किंमत 19 हजार 125 रुपये चे विनापरवाना आढळून आले. लागलीच मुद्देमाल सह आरोपीला ताब्यात घेत त्याच्या घराची तपासणी दरम्यान 5 लाखाचे सागवान जप्त करण्यात आले असून तस्करी साठी वापरण्यात येणारी गाडी जप्त करण्यात आली आहे. वन विभागाने या प्रकरणी तोतया पत्रकार सह 4 आरोपींना अटक केली आहे.