उपस्थितांनी घेतली प्रतिज्ञा
अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्व. इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले व उपस्थितांना एकात्मता दिवसाची प्रतिज्ञा दिली. जयंती कार्यक्रमाला आस्थापना विभागाचे उपकुलसचिव मंगेश वरखेडे, तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.