मुंबई :- देशाचे माजी प्रधानमंत्री दिवगंत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्ताने आज मंत्रालयात अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उप सचिव प्रकाश इंदलकर, अवर सचिव, रविंद्र पेटकर, सहायक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयीन अधिक्षक, विजय शिंदे यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.