खंडणी मागणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- दिनांक २७.०५.२०२३ चे १४.३० वा. व दि. ३०.०५.२०२३ चे १६.०० वा. चे दरम्यान पोलीस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊ पेठ, संताजी मठ, बब्बू मेंबरचे घराजवळ राहणारे फिर्यादी रवि दिपक समर्थ वय २४ वर्ष. हे घरी असताना आरोपी प्रिंस प्रमोद चहादे वय २८ वर्ष रा. भिम नगर झोपडपट्टी, जरीपटका याने फिर्यादीस आवाज देवुन बोलाविले व त्यांना तु बहोत माल कमा रहा है. मेरे को हर महिने खर्चा देना पड़ेगा, नहीं तो तेरी यही लाश गीरा दूंगा, अभी मुझे दारू के लीये ५००/- रू दे” असे म्हणून अश्लिल शिवीगाळ करून धमकी दिली. फिर्यादीने घाबरून आरोपीला ५००/- रू दिले. फिर्यादीने आरोपी विरुद्ध तक्रार केली नव्हती. दिनांक ३०.०५.२०२३ रोजी आरोपीने पुन्हा फिर्यादीचे घरासमोर येवुन पुन्हा फिर्यादीस धमकी देवून ५००/- ची मागणी केली. फिर्यादीने त्यास “मैं गरीब आदमी हु बारबार कहा से पैसे दूंगा” असे म्हटले असता आरोपीने कमरेतुन त्याचे जवळील लोखंडी तलवार काढुन अश्लिल शिवीगाळ केली व धाक दाखवुन “तुने मुझे हफ्ता नहीं दिया तो इस तलवार से तुझे काट के खाऊगा तेरे भाई सौरभ से भी मुझे हफ्ता होना, मैं अंदर रहु या बाहर मुझे फरक नही पडता, मै कीसीका भी खेल कर सकता हु” असे म्हणून फिर्यादीस हातबुक्कीने व लातेने मारहाण केली व घरासमोरील फिर्यादीची पांढरी अॅक्टीव्हा गाडी क्र. एम.एच ४९ बी.ए. ८६०१ ला लाथ मारून पाडुन नुकसान केले. तसेच शिवीगाळ करून मै तेरा हिसाब करूंगा असे म्हणून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो ठाणे पाचपावली येथे पोउपनि राजेश डोंगरे त्यांनी आरोपी विरुद्ध कलम ३८४ ३८५, २९४, ३२३, ४२७, ५०६ (ब), भादवि सहकलम ४/२५ भा.ह. का सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक

Wed May 31 , 2023
नागपूर :- फिर्यादी सचिन साबुदास महंत वय ३० वर्ष रा. खानगाव, सावनेर, ह.मु. बिल्डींग न. ५३ प्रधानमंत्री आवास योजना, तरोडी, वाठोडा याचे रश्मी लोखंडे नावाचे महिले सोबत मागील दिड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तसेच नमुद महिला रश्मी लोखंड हिचे आरोपी नामे स्नेहल रंजन घोडेस्वार वय ३८ वर्ष रा. प्लॉट न. ४४, न्यू शंकर नगर, दिघोरी नाका याचे सोबत सुद्धा प्रेमसंबंध असल्याचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights