राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता तपासणी समितीची महालगाव ग्रामपंचायत ला भेट

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19 अंतर्गत राज्यस्तरीय समिती मार्फत कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महालगाव ग्रामपंचायत ला राज्यस्तरीय समितीने भेट देत महालगाव ग्रामपंचायतीची तपासणी केली. यावेळी तपासणी समितीमध्ये पाणी पुरवठा व स्वछता विभाग मंत्रालय मुंबई चे अवर सचिव चंद्रकांत मोरे ,कक्ष अधीकारी हजारे, सहाय्यक अधिकारी पात्रे प्रामुख्याने उपस्थित होते.

उल्लेखनीय म्हणजे कामठी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महालगाव ग्रामपंचायतने विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला होता त्यामुळे 5 नोव्हेंबरला राज्यस्तरीय समिती मार्फत महालगाव ग्रामपंचायतला राज्यस्तरीय समितीने भेट देऊन ग्रामपंचायतीची तपासणी केली.या तपासणी दरम्यान आवश्यक सर्व बाबींची दिवसभरात पाहणी करण्यात आली ज्यात वयक्तिक शौचालय,सार्वजनिक शौचालय,घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ,पाणी पुरवठा स्रोत विहीर,मिटरसह नळ कनेक्शन, शाळा, अंगणवाडी,गृहभेटी ,खत निर्मिती केंद्र .तसेच अंतर्गत असलेल्या आसोली गावातील पाझर खड्डा,शोषखड्डे, सार्वजनिक शौचालय,इत्यादीची पाहणी केली.

संत गाडगेबाबा स्वछता अभियान अंतर्गत राज्यस्तरावर प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतीला 50 लक्ष रुपया पर्यंतचा प्रथम पुरस्कार प्राप्त होणार आहे. सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, शुद्ध पाण्याचा पुरवठा,गावातील दृष्यमान स्वछता ,व्यक्तीक व सार्वजनिक शौचालयाचा वापर आणि स्वछता, शालेय व अंगणवाडी येथे स्वछता सुविधांची सोय आदी विषयावर गुणांकन केले जाणार असून गावात शाश्वत स्वछता सुविधा राहाव्यात तथा गावाला पुरस्कार मिळण्यासाठी गावकऱ्यांनी आपले गाव स्वच्छ ठेवण्यावर भर द्यावा असे आवाहन अवर सचिव चंद्रकांत मोरे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आदिवासी दिव्यांग मुलाला शाळेत शिक्षिकेकडून अमानुष वागणूक

Mon Nov 7 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कामठी – नागपूर मार्गावरील भिलगाव नाका नंबर दोन कवठा परिसरातील सीबीएसई शाळेत पाचव्या वर्गात शिकत असलेल्या आदिवासी दिव्यांग विद्यार्थ्याला शिक्षिकेने चक्क उन्हात दीड तास उभे ठेवून अमानुष शिक्षा दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासाठी शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्याला चक्क शाळेतून आठवड्या भऱ्यासाठी निलंबित केले आहे प्राप्त माहितीनुसार आर्यन सुरेश राठोड हा माउंट लीटरा झी स्कूल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com