गोंडेगाव कोळसा खदान चा ट्रक मध्ये १२ टन कोळसा चोरून नेताना पकडले.

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

सुरक्षा अधिकारी च्या तक्रारीने पोस्ट कन्हान ला २ आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून २१,२०,००० रूपयाचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस १० कि मी अंतरावर गोंडेगाव खोल खुली खदान येथील कोळसा चोरी करून ट्रक मध्ये भरून नेताना प्रभारी सुरक्षा अधिकारी हयानी पेट्रोलिंग दरम्यान भाटिया बंद कोल वासरी जवळ ट्रक मध्ये चोरीच्या १२ टन कोळसा भरून चोरून नेताना ट्रक चालका सह ट्रक पकडुन कन्हान पोलीस स्टेशन ला वेकोलि सुरक्षा अधिकारी यांच्या तक्रारीने कन्हान पोलीसानी ट्रक व १२ टन कोळसा असा एकुण २१ लाख २० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.२२) ला रात्री १२ वाजता वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी नागनाथ चरणदास खोब्रागडे वय ४५ वर्ष रा. गोडे गाव कॉलोनी हे गोडेगाव खुली खदान परिसरात पेट्रोलिंग गाडी सोबत सुरक्षा रक्षक शिवमुरत कुरील, आशिष घोपटे, अधिकरण बेहुने सह पेट्रोलिंग करीत असताना मध्यरात्री २ वाजता गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली कि, गोडेगाव वस्तीच्या मागुन ट्रक क्र आर जे ०९ – सीबी ९३७० मध्ये चोरीचा कोळसा भरून निघत आहे. अश्या माहीतीवरून सदर ट्रक भाटिया बंद कोल वासरी समोर रात्री २.१० वाजता दरम्यान पकडुन त्यास ताब्यात घेत चालका भवरसिंग रामसिंह चौव्हाण असे नाव सांगितले व गाडीची पाहणी केली असता अंदाजे १२ टन कोळसा किमत १,२०,००० रु चा माल ट्रक मध्ये दिसला. सदर चोरीचा कोळसा हा फारूख अब्दुला शेख याचा असल्या चा सांगितल्याने कोळसा बाबत कागदपत्र विचारले असता कोळसाचे कागद पत्र नसल्याचे सांगितल्याने ट्रक चालका व कोळसासह ट्रक ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशन ला जाऊन वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी नागनाथ खोब्रागडे हयानी वेकोलि चा कोळसा चोरीची केल्याची तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी ट्रक क्र आर जे ०९ -जीबी ९३७० किमत २०,००,००० रूपये व कोळसा १२ टन किमत १,२०,००० रूपये असा एकुण २१ लाख २० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपी ट्रक चालक १) भरवसिंग रामसिंग चौव्हाण वय ४० वर्ष रा. पोलुखेडी जि. रतनाम ( मध्य प्रदेश) २) फारुख अब्दुला शेख रा. कांद्री या दोघा विरूध्द अप क्र /३०६ /२२ कलम ३७९, १०९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com