अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अन्यथा शिवसेना स्टाईल ने आंदोलन करण्यात येईल- देवेंद्र गोडबोले (शिवसेना जिल्हाप्रमुख नागपूर)

नागपूर :- दोन दिवसा पासून सतत सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यावर आज मरण्याची वेळ आली परंतु शासनाने नियोजित केलेल्या पीक विमा ची तक्रार अप्लिकेशन काम करत नाही. तक्रार नोंदविता येत नाही. टोल फ्री क्रमांक काम करत नाही. लवकरात लवकर पंचनामा होणे गरजेचे आहे. विमा कंपन्या लक्ष देत नसून शासनाने तात्काळ लक्ष देऊन कारवाई करणे गरजेचे आहे. या सर्व खालील मागण्याच्या अनुषंगाने आज शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले याणी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाला निवेदन दिले ज्यानुसार

1)शेतकऱ्यांचे पीक कर्ज सरसकट माफ करण्यात यावे.

2)शेतकऱ्यांचे शासनातर्फे 50 हजार रुपये एकरी मदत देण्यात यावी.

3)शेतकऱ्यांचे कृषि पंपाचे विधुत बिल माफ करण्यात यावी.

4)पेच प्रकल्पाची पाणीपट्टी माफ करण्यात यावी.

5)पीक विम्याची रक्कम लवकरात लवकर जमा करण्यात यावी.

या मागण्या केलेल्या असून मागण्या मान्य न झाल्यास भव्य आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले,रामटेक सहसम्पर्क प्रमुख उत्तम कापसे,तालुकाप्रमुख सधुकर हटवार, हरिभाऊ लोहबरे,नगरसेवक शिवराज माथुरकर,सरपंच अक्षय पंचबुधे, युवासेना शहरप्रमुख जितु साठवणे,किशोर कानफाडे, प्रमोद बरबटे, प्रवीण कारेमोरे, दिगंबार बांगलकर,बंटी हटवार, दामू ठाकरे, सचिन तिघरे, प्रदीप मेहर, प्रदीप पोटफोडे, हरिओम पंचबूढे, मुन्ना वैरागडे,यशवंत गायधणे, प्रफुल म्हहले,सुधाकर कानफाडे, पांडे जी, सचिन वंजारी, दुर्गेश वैद्य,मोतीराम सोमनाथे,अनुराग कुंभलकर,उमेश भोतमांगे,नाना ठाकरे, नंदू दहाके, शरद हिंगे, केशव धोबळे, सतीश वानखेड़े,सुरज बोरीकर, आशिष मेहर, संजय मेहर, रोशन भोयर, स्वप्निल मानकर, धनराज जुमळे,झलकेजी, कैलास पंचबूढे, शेकडो शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यात शेतकऱ्यावर अवकाळी पावसाचे संकट

Wed Nov 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – शेकडो हेकटरवरील कापणी केलेल्या धानाच्या कडपा पाण्यात भिजल्या कामठी :- विदर्भात हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार 27 ते 29 नोव्हेंबर पर्यंत कामठी तालुक्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.परिणामी 27 नोव्हेंबरपासून कामठी तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण होत पावसाचे ढग तयार झाले होते तर 28 नोव्हेंबर ला कामठी तालुक्यात पहाटेपासूनच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असता खरीप हंगामातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com