सुरवातीस मनपा आयुक्त बी राधाकृष्णन हे जागेवर नसल्याने बसपा नेत्यांनी समस्या ग्रस्तांना घेऊन अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी ह्यांची भेट घेऊन समस्येची गंभीरता समजावून सांगितली. दरम्यान मनपा आयुक्त उपस्थित झाले परंतु फक्त दोघांनाच भेटण्याची परवानगी असल्याचे सांगितल्याने बसपा नेते भडकले. होहल्ला झाल्यावर पाच व्यक्तींच्या शिष्टमंडळाला परवानगी दिल्यावर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मनपा आयुक्तांनी समस्या सोडविण्यासाठी पाणी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता डॉ श्वेता बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समस्येशी अवगत करण्याच्या सूचना दिल्या, डॉ ब्यानर्जी ह्यांना खालील समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
अंबाझरी, पांढराबोडी, सुदाम नगरी आदी स्लम पट्ट्यातील अनेकांचे नळ कनेक्शन कापले ते जोडावे व पेंडिंग बिल चे हप्ते पाडण्यात यावे तसेच त्यांच्यासाठी कमी दर ठेवण्यात यावा. सोबतच अभय योजना राबवावी. नारा परिसरातील साई मंदिर, निर्मल कॉलनी, ओम नगर, गणेश नगरी, अशोका नगर, विश्वभारती लेआउट, अंजनी पुत्र लेआउट, आंबा टोली, समता नगर, अन्वर लेआउट, धम्म ज्योती नगर, शिवप्रसाद सोसायटी, अंबिका सोसायटी, विजय लेआउट, नारी वस्ती या वसाहतीतील अर्धवट लाईन पूर्ण करावी. व जोपर्यंत लाईन पूर्ण होत नाही तोपर्यंत अधिकचे टॅंकर पाठवण्यात यावेत. जयताळा वसाहतीत पाणी सोडण्याची वेळ बदलन्यात यावी ही मागणी सुद्धा करण्यात आली. तसेच रेशीम बाग ते सिरसपेठ या भागातील गडर लाईनचे घाण पाणी पिण्याच्या पाण्यात मीक्स झाल्याने त्या दूषित पाण्यामुळे आरोग्याची समस्या निर्माण झाल्याची माहिती सुद्धा देण्यात आली.