‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी ‘गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी संजय दैने यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई :- ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ गडचिरोली जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत प्रसारित होणार आहे.

जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा व सुव्यवस्था कार्यवाही, माध्यमप्रमाणी करण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयी सुविधा याबाबत दैने यांनी माहिती दिली आहे. गडचिरोलीचे जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांनी ही मुलाखत घेतली आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांची मुलाखत मंगळवार दि.१६ एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मोदी, शाहा आणि गडकरी चालवतात भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करणारी “लॉन्ड्री” - मल्लिकार्जून खरगे

Mon Apr 15 , 2024
– भाजपकडे भ्रष्टाचाराचे आरोप स्वच्छ करणारी मोठी “लाँड्री”: मल्लिकार्जून खरगे यांचा घणाघात – विकास ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला उदंड प्रतिसाद नागपूर :- भाजपकडून विरोधीपक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येतात. नंतर मोदी ते भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये आणतात, मग अमित शाह त्यांना वॉशिंगमशीनमध्ये टाकतात आणि नितीन गडकरी त्या भ्रष्टाचाऱ्यांना बाहेर काढतात. यांच्या लॉन्ड्रीमधून निघालेला भ्रष्टाचाराचे आरोप असलेला नेता हा पूर्णपणे स्वच्छ होतो. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com