बाबा जुमदेवजी यांची १०१ वी जयंती उत्साहात

– गट क्र. १० मधून निघाली रॅली
नागपुर – अंधश्रध्दा निर्मूलन, व्यसनमुक्त समाज घडविणारे मानव धर्म व परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेवजी यांची १०१ वी जयंती रविवार (ता.३) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्ताने परमात्मा एक सेवक मंडळ गट क्र. १० च्यावतीने भव्य रॅली काढण्यात आली होती. जयंतीनिमित्ताने मंडळाकडून विविध धार्मिक व लोकोपयोगी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

जुमदेव बाबा यांच्या जयंतीनिमित्ताने गट क्र. १० च्यावतीने शनिवार २ एप्रिल रोजीपासूनच बेसा मार्गावरील विज्ञान नगर येथील रवींद्र कुंभारे यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत हवन, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर रविवार ३ एप्रिल रोजी जयंतीदिनी सकाळी ८ वाजता भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचे पुजन करुन बाबा जुमदेवजी व त्यांच्या पत्नी वाराणसी जुमदेवजी ठुबरिकर यांच्या प्रतिमेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर विज्ञान नगर येथून शेकडो सेवक, सेविकांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली. ही रॅली विज्ञाननगर, मानेवाडा, अमरनगर, उदयनगर रिंग रोड, म्हाळगीनगर चौक, बसवेश्वर पुतळा, अयोध्यानगर, मानेवाडा चौक असे मार्गभ्रमण करित कार्यक्रमस्थळी पोहचली. या शोभायात्रेत जुमदेवजी यांनी केलेल्या आध्यात्मिक व समाजिक कार्याचे फलक, त्यांचे संदेश, शिकवण, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन आदी समाजापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न सेवकांकडून झाला. महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

एमआईडीसी की बंद कंपनियों में हो रही है लोहे की चोरी

Sun Apr 3 , 2022
– हाल ही में एमएपीएल कंपनी में चोरी का मामला सामने आ चुका है हिंगना संवाददाता – एमआईडीसी क्षेत्र में कोरोना काल में कई कंपनियों में कामकाज बंद हो गया था। कुछ कंपनियां में मशीनें कबाड हो चुकी है। इन कंपनियों से कबाड चोरी होने की घटनाएं सामने आने लगी है। हाल में एमएपीएल कंपनी से कबाड चोरी की शिकायत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com