नागपूर :- 15 ऑगस्ट 76 व्या स्वतंत्रदिनी टिळक पत्रकार भवन व नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने झेंडावंदन कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. त्यावेळी टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व प्रेस क्लब व महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र व नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस ब्रह्मा शंकर त्रिपाठी यांच्या उपस्थितीत झेंडावंदन करण्यात आले. यावेळी व्यवस्थापक प्रभाकर दुपारे, विश्वास इंदूरकर, सुरेश कनोजिया, महेश उपदेव, गणेश शिरोळे, भुपेंद्र गणवीर, चंद्रशेखर जोशी, राहुल अवसरे, चारुदत्त कहू, रामू भागवत, वर्षा तुपकर आदी पत्रकारांची उपस्थिती होती.