दारू भट्टीवर छापे ; एकुण 9,50,000 रूपयाचा मुद्देमाल जप्त..

कळमेश्वर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण यांची धडक कारवाई

नागपूर / कळमेश्वर  – कळमेश्वर पोलिस स्टेशन हद्दीतील गोंडखैरी येथील पारधी बरड येथे मोठया प्रमाणावर अवैध गावठी दारू तयार करून तीची मोठ्याा प्रमाणावर आजुबाजुचे परीसरात विक्री होत असल्याची गोपनिय खबर कळमेष्वर पोलिसांना मिळाल्याने  पोलिस अधिक्षक  विजयकुमार मगर, अपर पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर,  उपविभागीय पोलिस अधिकारी  अजय चांदखेडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रभारी ओमप्रकाश कोकाटे यांचे सह पोलिस स्टेशन कळमेश्वर चे प्रभारी अधिकारी  आसिफराजा शेख यांचे नेतृत्वाखाली आज दिनांक 13/06/2022 रोजी पहाटे 06.00 वा. सुमारास पोजिस स्टेशन कळमेश्वर हद्दीतील गोंडखैरी पारडी बरड येथे सुरू असलेल्या अवैध दारू भट्टीवर छापे मारून एकुण 9,50,000/-रू. मुद्देमाल जप्त करून एकुण 07 आरोपीतांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपीतांवर पोलिस स्टेशन कळमेश्वर येथे दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे. सदर कारवाई दरम्यान एकुण 7400 लिटर कच्चे रसायन सडवा, 190 लिटर तयार दारू जप्त करण्यात आली असून दारूभट्टी साठी लागणारे एकुण 52 ड्रम, घमेले व दारू तयार करणेकामी लागणारे साहीत्य जप्त करून गावठी दारूच्या भट्टया उद्धवस्त करण्यात आल्या आहे.
सदर कारवाईसाठी सपोनि मूंडे, सपोनि मनोज खडसे, सपोनि मेश्राम, पोउपनि मूंडे, गायकवाड, पोउपनि गेडाम, सफौ मन्नान , हिवरकर, पाली, पोहवा उईके, पोलिस नाईक मुदमाळी, बोरकर, मेश्राम, पोलिस शिपाई निलेश उईके व कळमेश्वर पोलिस स्टेशन इतर कर्मचारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा नागपूर येथील सपोनि  अनिल राउत व इतर कर्मचारी हजर होते.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com