संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- देशाच्या महिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा प्रत्येक कार्यालयात लावण्यात यावी अशी मागणी भाजप पदाधिकारी व माजी नगरसेवक कपिल गायधने यांनी शासनाकडे केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पदभार सांभाळून सहा महिनेच्या वरील कार्यकाळ झाला आहे. कामठी तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालयात अद्याप त्यांची प्रतिमा लावण्यात आलेली नाही ही बाब सहन करण्यायोग्य नाही तरी प्रत्येक शासकीय कार्यालयात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रतिमा त्वरित लावण्यात यावी अशी मागणी भाजप पदाधिकारी व माजी नगरसेवक कपिल गायधने यांनी केले आहे.