संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील मौजा- भुगाव येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन सन 2023 -24 अंतर्गत तयार केलेल्या नैसर्गिक शेतकरी गटांचे गाव स्तराय प्रथम शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात आले. मौजा -भुगाव गावातील नैसर्गिक शेती गटातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .सर्वप्रथम उपस्थित सर्व शेतकरी आणि तज्ञ मार्गदर्शक यांचे स्वागत करण्यात आले.नाशिक जांभुळकर स. तं. व्य.(आत्मा )यांनी नैसर्गिक शेतीची संकल्पना व उद्दिष्टे सांगून कार्यक्रमाची सुरुवात केली व अंबुलकर मंडळ कृषी अधिकारी वडोदा यांनी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योजनेबाबत सविस्तर माहिती गटातील शेतकऱ्यांना पटवून सांगितले जमीन निर्मितीसाठी सेंद्रिय शेतीची माहिती, शेतात आंतरपीक मिश्र ,पीक पद्धती सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा आपण घरच्या घरी तयार केल्या पाहिजे सेंद्रिय खतपूरक खते जशी जीवामृत ,अमृत पाणी बिजामृत ,जिवाणू खते तयार करून शेतात पिकाला वापर करणे कीड नियंत्रणासाठी मित्र किडींची ओळख करून घेणे गरजेचे आहे. याबाबत समजावून सांगितले. कृ.प. मनीष मालोदे यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे हे शेतकऱ्यांना पटवून सांगितले आपल्या शेतात सेंद्रिय शेतमाल सकस आहार कसे उत्पादित करता येईल परिवारासाठी व इतरांसाठी साठी कसं सेंद्रिय शेतमाल उत्पादित करता येईल व विक्री करता येईल त्याबाबत माहिती या प्रशिक्षणामध्ये सविस्तर देण्यात आली. या प्रशिक्षणाला लाभलेले तज्ञ मार्गदर्शक विकास येडणे यांनी सेंद्रिय शेती बद्दल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती जसे शेतामध्ये आंतरपीक, मिश्र पीक पद्धती सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठा आपण घरच्या घरी तयार केल्या पाहिजे प्रामुख्याने बायोडायनिक खत ,सेंद्रिय खत ,जीवामृत ,अमृत पाणी, बिजामृत जिवाणू खते तयार करून वापरायला हवीत किड नियंत्रणासाठी मित्र किडींची ओळख करून घेणे गरजेचे आहे .घरच्या घरी वनस्पतीजन्य किटकनाशके तयार करणे जसे दशपर्णी अर्क आवश्यक आहे .सेंद्रिय शेतीचे सिद्धांत नैसर्गिक संसाधनाच्या परिणामकारक वापर तसेच प्रदूषण जोपासणे ,जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढविणे करिता हिरवळीचे खत, जैविक खते विषमुक्त व पोषण युक्त उत्पादन घेणे शेतीतील जैविक विविधतेवर वाढ करणे याबाबत मार्गदर्शन केले. पल्लवी तलमले प्रकल्प उपसंचालक (आत्मा )नागपूर ,यांनी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन गटातील लोकांना करून या योजनेविषयी माहिती देण्यात आली .गटाचे व एफ. पी .ओ .चे महत्व ,उत्पादित मालाची पॅकिंग, ब्रॅण्डिंग ,व विक्री व्यवस्थेबद्दल माहिती, कृषी विभागाच्या संपूर्ण योजनेची माहिती. या प्रशिक्षणामध्ये देण्यात आली. गटाचे अध्यक्ष प्रमोद अरुण ढोबळे यांनी गटातील शेतकऱ्यांना या योजनेबाबत गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांचे अडीअडचणी दूर करून शेतकऱ्यांच्या समस्येवर निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाला कृषी विभागातील कृषी सहाय्यक सुनीता राठोड व राहुल निंभोरकर, मल्लेवार तसेच गटातील शेतकरी भरपूर संख्येने उपस्थित होते .या प्रशिक्षणाला शेतकरी गटातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.