येरखेडा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आरक्षण सोडत 6 जून ला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-कामठी तालुक्यातील 27 ग्रा प चे आरक्षण सोडत 6 जून ला
कामठी ता प्र 2:-कामठी तालुक्यातील एकूण 47 ग्रामपंचायती पैकी 27 ग्रामपंचायत चा पंचवार्षिक कार्यकाळ यावर्षीच्या शेवटी संपण्याच्या मार्गावर असल्याने मुदत संपणाऱ्या या 27 ही ग्रामपंचायतीच्या अंतिम प्रभाग रचना प्रारूप ‘अ’ 27 मे ला जाहीर करण्यात आले असून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक (सदस्य संख्या, प्रभाग रचना व आरक्षण)आदेश 2021 अनव्ये कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या 30 मे 2022 आदेशानुसार जाहीर केलेल्या आरक्षण कार्यक्रमा अनव्ये आरक्षण सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभा बोलावून तहसिलदार अक्षय पोयाम यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रारूप प्रभाग रचनेवर (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला)आरक्षणाची सोडत 6 जून ला काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अक्षय पोयाम तसेच निवडणूक विभागाचे चंद्रिकापुरे यांनी दिली.
आरक्षणाच्या सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे हरकती व सूचना 7 ते 10 जून पर्यंत दाखल करण्याचा कालावधी आहे.उपविभागीय अधिकारी हे प्राप्त हरकती विचारात घेऊन अभिप्राय 15 जून पर्यंत देतील.हे अभिप्राय विचारात घेऊन अंतिम अधिसूचनेस (नमुना अ)जिल्हाधिकारी 17 जून पर्यंत मान्यता देतील.तर 20 जून ला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तेव्हा या आरक्षण सोडतीमध्ये नागरिकांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान तहसिलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे .
कामठी तालुक्यात एकूण 47 ग्रामपमचायती आहेत यापैकी मुदत संपलेल्या 20 ग्रामपंचायती ची निवडणूक यापूर्वी झाली असून उर्वरित 27 ग्रा प ची मुदत संपण्याच्या मार्गावर असून आगामी काळात होऊ घातलेल्या या 27 ग्रा प ची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून 6 जून ला या प्रभाग रचनेवर आरक्षण सोडत निघणार आहे .आरक्षण सोडत निघणाऱ्या या 27 ग्रामपंचायतीत येरखेडा,रणाळा, बिना, भिलगाव,खैरी, खसाळा, सुरादेवी, खापा,कढोली, भोवरी, आजनी,लिहिगाव, कापसी(बु),गादा,सोनेगाव,गुमथी, आवंढी,गुमथळा, तरोडी बु,परसाड,जाखेगाव, केम, दिघोरी, आडका, शिवणी, भुगाव, वडोदा चा समावेश आहे.या 27 ही ग्रामपंचायतची एकूण लोकसंख्या 70 हजार 654 असून यामध्ये 12 हजार 537 अनु जाती तर 2979 अनु जमाती ची लोकसंख्या आहे तर या 27 ग्रा प मध्ये 93प्रभाग राहणार असून एकूण 247 सदस्य निवडून येणार आहेत यामध्ये अनु जाती चे 42, अनु जमाती चे 7 , नामाप्र चे 43 व सर्वसाधारण प्रवर्गातील 155 सदस्यांचा समावेश राहील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

एसटी बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही 65 वर्षे

Thu Jun 2 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 2-शासनाकडून 60 वर्षे वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते मात्र एस टी बस मध्ये तिकीटावरील 50 टक्के सवलत घेण्यासाठी 65 वर्षे वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याची बाब नुकतीच कामठी बस स्थानकावर निदर्शनास आली असून यामुळे ज्येष्ठ असूनही सवलतीचा लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये एस टी बस प्रशासना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com