नागपूर :- युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊतांनी जे महान स्वतंत्रता सेनानी वीरसावरकरांचा पुतळा जाळण्याचा अक्षम्य कृत्य नागपूर विद्यापीठ परिसरात केला, त्याबाबतीत नागपूर विद्यापीठ प्रशासनाने पोलिस स्टेशनला FIR नोंदवून त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करीता आज विद्यापीठ व्यवस्थापन समितीची बैठक धुडकाऊन लावली व ठिय्या आंदोलन केले. यावेळी प्रामुख्याने भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, आमदार प्रवीण दटके, शहर संघटन महामंत्री व सिनेट सदस्य विष्णू चांगदे, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगर अध्यक्ष बादल राऊत यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
कुणाल राऊत यांनी विद्यापीठ परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्या प्रकरणी विद्यापीठातर्फे काहीपण कारवाही न झाल्यामुळे आज होणारी विद्यापीठ व्यवस्थापन समितीची बैठक उधळुन लावली जोपर्यंत विद्यीपिठातर्फे झालेल्या तक्रारीची एफ आय आर ची कॉपी विद्यापीठात आली नाही तोवर युवा मोर्चाचे सर्व पदाधिकारी तेथे ठिय्या मांडून बसले होते.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्रेयस कुंभारे, भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर शहर महामंत्री सागर घाटोळे, सौरभ पराशर, अमेय विश्वरूप, संपर्क महामंत्री सन्नी राऊत, मंडळ अध्यक्ष अक्षय ठवकर, नागेश साठवणे, आशिष मिश्रा, कुलदीप माटे, शहर संपर्क प्रमुख केतन साठवणे, शशांक समुद्रे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सोशल मीडिया सह संयोजक वि एन रेड्डी, मनमित पिल्लारे, भा.ज.यू.मो नागपूर महानगर सह-प्रचार प्रसार प्रसिद्धी प्रमुख वेदांत जोशी, कार्यालयीन मंत्री तुषार जौंजाळ, उदय मिश्रा, स्वप्निल खडगी, अनिकेत ढोले, प्रज्वल मंगर, रूपेश ठाकरे, पिंकेश पटले, राहुल कृष्णानि, बलराम मनुजा, मोंटी नागेश्वर, रोशन डोंगरे, प्रिंस गुप्ता,जयेश बिहारे, हर्षल मालमकर, साहिल गोसावी, उदय धोमने, हर्षल दहीकर, मयूर इंगोले, प्रसाद हडप, तेजस भागवतकर, तुषार वानखेड़े, मयूर चित्रम, आकाश भेदे, यश घोरपडे, पवन महाकाळकर, अक्षुन खापरे, रोहित सहारे, हितेश देवळे, भावेश माताघरे, राहुल वाटकर, सागर भागाकर, प्रशांत दुरुगकर व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.