संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-सदभावना ग्रुप च्या मागणीला यशप्राप्त
कामठी ता प्र 12- कामठी नगर परिषद तर्फे हुतात्मा स्मारक येथे मागील काही वर्षांपूर्वीपासून सार्वजनिक वाचनालय कार्यरत होते.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कामठी नगर परिषद तर्फे सदर हुतात्मा स्मारक येथे कोरोना तपासणी व लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते मात्र आजच्या स्थितीत कोरोनाचा प्रदूर्भाव संपला असून सर्वसामान्य स्थिती असून प्रशासनातर्फे निर्बंध सुद्धा उठविले आहे तरीसुद्धा हुतात्मा स्मारक वाचनालय पूर्ववत पद्धतीने सुरू न करण्यात आल्याने वाचकांची एक प्रकारे कुचंबनाच करण्यात आली होती तेव्हा शहरातील वाचक वर्गाचे हित लक्षात घेता कामठी नगर परिषद ने पुढाकार घेऊन हुतात्मा स्मारक वाचनालय सुरू करण्यात यावी या मागणीला सदभावना ग्रुप कामठी ने रेटून धरीत मुख्याधिकारी ला समूहिक निवेदित करण्यात आले होते या मागणीचे गांभीर्य लक्षात घेता मुख्याधिकारी संदीप बोरकर यांनी हुतात्मा स्मारक वाचनालय पूर्ववत पद्ध्तीने सुरू करण्याच्या दिलेल्या मागणीवरून आज 11 जुलै पासून हुतात्मा स्मारक वाचनालय कायस्वरूपी सुरू करण्यात आले. तर नागरी हितार्थ असलेली वाचनालय च्या मागणीला मुख्याधिकारी ने पूर्ण केल्याबद्दल सदभावना ग्रुप कामठी च्या वतीने मुख्याधिकारी संदीप बोरकर यांचे आभार मानत हुतात्मा स्मारक वाचनालय प्रबंधक कौशल्याताई शर्मा यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले.
याप्रसंगी कामठी वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी दिपंकर गणवीर, प्रफुल लूटे, सदभावना ग्रुप चे प्रमोद खोब्रागडे,सुनील बडोले, नरेश फुलझेले, अविनाश भांगे, राकेश कनोजिया, सुनील चहांदे, आसाराम हलमारे,प्रा.फिरोज हैदरी, सलीम, सज्जाक शेख, यासिन, प्रमोद रंगारी , तसेच नागसेन गजभिये,आशिष मेश्राम आदी उपस्थित होते.
आजचे तरुण मंडळी सोशल मीडियावरील जुजबी वाचन करीत असल्याने ते भरकटण्याची शक्यता बळावली आहे. जगण्यासाठी जसे अन्न आवश्यक आहे तसेच जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनही अत्यंत महत्वाचे आहे.मात्र या बंद वाचनालया मुळे येथील वाचक वर्ग हा सर्वाधिक काळ मोबाईलवर तसेच दूरचित्रवाणी संचासमोर बसलेले आढळतात तेव्हा येथील वाचन संस्कृती कायम ठेवण्यासाठी हुतात्मा स्मारक येथील बंद वाचनालय पूर्ववत सुरू करण्यात यावे अशी मागणी सदभावना ग्रुप च्या तरुण मंडळींनी केली होती.अखेर या मागणीला यष्प्राप्त झाले व वाचकांसाठी हुतात्मा स्मारक पूर्ववत सुरू झाले. हे वाचनालय दररोज सकाळी 8 ते 11 तसेच सायंकाळी 5 ते 8 पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती प्रबंधक कौशल्याताई शर्मा यांनी दिली.