जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची निदर्शने

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :-  समाजकार्य महाविद्यालय, कामठी येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारच्या विरोधात निदर्शने केली. पेन्शनसाठी उभारण्यात आलेल्या राज्यव्यापी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी न होऊ शकलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून कामकाज केले. “पेन्शन आमच्या हक्काची; नाही कुणाच्या बापाची”,”एकच मिशन जुनी पेन्शन” असे नारे देत कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनची मागणी लावून धरत  सरकार विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com