कोदामेंढी :- येथील सरपंच आशिष बावनकुळे यांच्या पथदिप घोटाळ्याची ऑनलाईन तक्रार सामाजिक कार्यकर्ते मौदा गट विकास अधिकारी ते मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत मागील दोन दिवसापूर्वी पासून करत होते. याबाबत अखेर आज शुक्रवार 18 ऑक्टोबरला मुंबई मंत्रालयातून कारवाई करण्याचे पत्र सामाजिक कार्यकर्त्यांना मेल आयडी वरून ऑनलाईन धडकले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील ग्रामपंचायतचे सरपंच आशिष बावनकुळे यांनी गावात निविदा धारक पथदिव्यांच्या पुरवठा करणारे सुरेश निमकर यांचे श्रीकृष्ण हार्डवेअर व इलेक्ट्रिकलचे जीएसटी धारात मोठे दुकान असूनही येथून 75 किलोमीटर दूर असलेल्या नागपूर येथील एम. एम. इंटरप्राईजेस या दुकानातून बेकायदेशीरपणे 3,88, 474 रुपयाचे 30 मे 2024 ला पथदिवे खरेदी करण्याचे बिल एकही पथदीप खरीदी न करता बोगस बिल जोडून पैसे काढून घोटाळा केला .
याबाबत मागील दहा दिवसांपूर्वीपासून मराठी व हिंदी दैनिकांमधून वृत्त मालिका सुरू आहे .याबाबत सामाजिक कार्यकर्ते गट विकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी ,ठाणेदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण व मुंबई मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय यांच्याकडे पुराव्यासह व बातम्यांचे कात्रण कापून मागील दोन दिवसापासून शासनाने उपलब्ध करून दिलेल्या मेल आयडी च्या माध्यमातून तक्रारी करत आहेत .याची दखल घेत आज शुक्रवार दिनांक 18 ऑक्टोबर दुपारी तीन वाजता दरम्यान मुंबई मंत्रालय उपमुख्यमंत्री यांचे कार्यालयातून सामाजिक कार्यकर्त्यांना ऑनलाइन पत्र प्राप्त झाले असून प्रधान सचिव ,ग्राम विकास व पंचायत राज विभाग कारवाई करणार असल्याचे पत्रात नमूद आहे.
मुंबई मंत्रालयातील प्रधान सचिव किती दिवसात व कोणती कारवाई करतात याकडे गावातील, परिसरातील तालुक्यातील व जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.