वेकोली इंदर खुली खदान खाजगी सुरक्षा रक्षकावर गोळी मारून केले गंभीर जख्मी..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत वेकोली खुली खदान इंदर काॅलरी नंबर ६ येथील मॅनेजर कार्यालय च्या मागे भर दिवसा वेकोली च्या एका एमएसएफ सुरक्षा कर्मचाऱ्यावर गोळ्या झाडुन त्याचा खुन कर ण्याचा प्रयत्नाने परिसरात चांगलीच खळखळ माजली आहे.

प्राप्त माहिती नुसार वेकोलि इंदर काॅलरी खुली खदान नं. ६ येथे कार्यरत एम एस एफ च्या सुरक्षा रक्षक मिंलिंद समाधान खोब्रागडे वय ५० हा काही दिवसा पुर्वी खदान मध्ये खाजगी सुरक्षा कर्मचारी म्हणुन कार्यरत असताना रविवार (दि.११) डिसेंबर ला दुपारी ४.१५ ते ५ वाजता दरम्यान इंदर काॅलरी च्या चेक पोस्ट व काटा घर वर कर्तव्यावर रजु होता. त्या वेळी आरोपी समिर सिद्धिकी वय २९ राह.अष्टविनाय क काॅलरी टेकाडी व राहुल जोसेफ जेकअप वय २६ राह. कांद्री हे एका दुचाकी वाहना वर एका इसमाचा शोध घेत तेथे आले. मिलिंद याने त्यांना हटकले की आपण प्रतिबंध क्षेत्रातातुन बाहेर जा म्हटले असता रागाच्या भरात आरोपी समीर याने आपल्या जवळील माऊझर सारखी वस्तु काढुन दोन फायर करून पाठी मागे कमरे वर एक गोली लागुन खाली पडल्यावर त्या च्या डोक्यावर तिसरी गोळी मारल्याने मिलींद गंभीर रूपाने जख्मी झाला. त्याला उपचारा साठी कामठी च्या खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू असुन त्याची प्रकृति चिंताजनक सांगितली जात असुन मुत्युशी झुंज देत आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक विशाल आनंद, उपअधिक्षक संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्तार बाग वान, स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीस निरिक्षक ओमप्रकाश कोकाटे व पथक, कन्हान पोली स व जिल्हयातील जवळील पोलीस अधिकारी व कर्मचारी घटस्थळी पोहचुन घटनेचा तपास करित आहे. बातमी लिहे पर्यंत कन्हान पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल झालेला नसुन दोन आरोपी समीर सिध्दृ्ीकी व राहुल जोसेफ जेकअप हयाना ताब्यात घेऊन आरोपी विरूध्द कलम ३०७, ३/२५ आरम अँक्ट अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपास स्थानिय गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण करित आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com