कोदामेंढी :- येथे व परिसरात हिरव्या मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, त्यातच नांदगाव येथील अनेक शेतकरी हिरवी मिरची लावतात. हिरवी मिरची तोळ्याला सुरुवात झाली असून कोदामेंढी येथील शेकडो महिला मजूर उपस्थित असलेली मजूर गंगा कोदामेंढीतून दररोज सकाळी सात वाजता नांदगाव शिवारात मिरची तोडायला जातात तर तेथून दुपारी एक वाजता परत गावाकडे येत असतात हा त्यांच्या रोजचाच उपक्रम आहे.
त्यातच आज येथील शेगावची भक्तिगंगा येथून 16 किलोमीटर अंतर असणाऱ्या तारसा येथील स्त्रीच्या मंदिरात सकाळी सात वाजता निघाली. रविवार दिनांक 20 ऑक्टोबरला रामटेक – भंडारा मार्गाने आवागमन करणाऱ्यांचे या दोन्ही भक्ती गंगांनी लक्ष वेधले होते.
यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मिरची पीक कोमात गेले ,तर जोमात आलेल्या धान पिकावर विविध रोगराईमुळे शेतकरी मेटकुटीस आला आहे. त्यातच यंदा हिरव्या मिरचीचे भाव तेजीत असून सुद्धा उत्पादन मात्र खूपच कमी असल्याने व मजुरांचे कामाचे तास कमी व रोजी वाढल्याने हिरव्या मिरची लावणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळ्यांना यंदा हिरव्या मिरचीने अश्रू आणल्याचे नांदगाव येथील शेतकऱ्यांनी नावं प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.