अमरावती :- रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, मुंबईचे (सेन्सॉर बोर्ड) अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपट अभिनेते विजय गोखले यांनी नुकतीच संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागाला सदिच्छा भेट दिली. गोखले म्हणाले, माझे वडील विद्याधर गोखल यांचं जन्मस्थळ आणि शालेय शिक्षण हे अमरावतीचेच. ते दैनिक लोकसत्ताचे संपादक होते आणि आज मला या अमरावतीमध्ये येण्याचा योग आला, हे खरोखर मी माझे भाग्य समजतो. इतर ठिकाणी हरकती घेतल्या जातात, मात्र संगीतात हरकती घेतल्या तर ते गवय्याच्या तयारीचे लक्षण दिसतं. खटके इतर ठिकाणी खटकतात, मात्र संगीतामध्य जागोजागी खटक्यानीच गीत रोमांचक होतं. 10 विद्याथ्र्यांची टिम असली की त्या 10 विद्याथ्र्यांचेे मनोबल किती मजबूत होतं, ते काय जादू करु शकतात, हे तुम्ही दाखवून द्याल, याची मला निश्चित खात्री आहे, असे सांगून त्यांनी प्रादर्शिक कला विभागाने अल्पावधीत केलेले कार्य आणि विद्याथ्र्यांना उपलब्ध करुन दिलेल्या सर्व सोयी-सुविधा पाहून आनंद व्यक्त केला. तसेच या विभागाच्या भविष्यातील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्यात.
याप्रसंगी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष विजय गोखले व सांस्कृतिक कार्य संचलनालय, मुंबईचे सचिव खामकर यांचा विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आजच्या या सत्कार समारंभाला रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, मुंबईचे सदस्य, डॉ. संजय पाटील, विभाग प्रमुख, नाटयशास्त्र विभाग, के. एस .के. कॉलेज, बीड, पी.डी. कुळकर्णी, जेष्ठ रंगकर्मी, अहमदनगर, शिंगटे , जेष्ठ रंगकर्मी, अहमदनगर, डॉ. जयंत शेवतेकर, माजी विभागप्रमुख, प्रादर्शिक कला विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, डॉ. दिलीप अलोणे, वणी, विश्वनाथ निळे, जळगांव आणि सतिश तराळ, अमरावती यांचे स्वागत प्रादर्शिक कला विभागाचे समन्वयक आर.एम.जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
या कार्यक्रमाला वित्त व लेखा अधिकारी डॉ.नितिन कोळी, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, मंगेश वरखेडे उपकुलसचिव तसेच सर्व अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरीता विभागाचे समन्वयक आर.एम. जाधव, प्रा. अमोल अढाव, डॉ. मोहन बोडे, प्रा.विद्या सावळे, प्रा. मनोज उज्जैनकर, निलेश ददगाळ, प्रविण राऊत, दिपीका रहाटे, पल्लवी सपकाळे, प्राची ढोके, अंकुश वानखडे, शुभम ठाकरे, अमेय अनसिंगकर, प्रविण खंडारे, राजू इंगोले, पारस भक्ते, संजय मकेश्वर आणि कोंडे यांनी परीश्रम घेतलेत.