शेतकरी व गावक-यांना राख तलाव व कोळसा धुळ प्रदुर्शनापासुन पुर्णत: मुक्त करणार -आदित्य  ठाकरे

संदीप कांबळे , विशेष प्रतिनिधी
–  खापरखेडा ची राख व कोळशा खदान, कोल वासरी च्या धुळ प्रदुर्षन बंद करिता दिले निवेदन. 
 
कन्हान : – औष्णिक विधृत केंद्र खापरखेडा येथिल राख विसर्जन करण्याकरिता नांदगाव-बखारी शेत शिवारात पेंच नदीच्या अगदी जवळ राख तलाव असुन या राखे मुळे नांदगाव गावक-यांच्या व शेतक-यांच्या  जनजीवनावर वाईट परिणाम होत, योग्य मोहबदला न देता भंयकर समस्या निर्माण झाल्याने तत्काळीन पर्या वरण मंत्री आदित्य ठाकरे हयानी तलावा मध्ये राख सोडणे कायमस्वरूपी बंद करून तलावातील ७०% राख बाहेर काढण्यात आली असुन मुळ समस्या सोडवुन नांदगाव च्या ग्रामस्थ व शेतक-यांना पुर्णत: न्याय मिळवुन देण्याकरिता मी कटिबंध्य असुन सोबत असल्याचे युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे साहेब हयानी आपल्या भेटी दरम्यान ग्रामस्थाना हमी दिली.
        शनिवार (दि.२७) ऑगस्ट २०२२ ला विदर्भातील शेतक-यांच्या अत्यंत महत्वाच्या पोळा सणाच्या पाळ व्याला युवा सम्राट, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबानी दुपारी ३.१० ला नांदगाव येथे भेट देऊन ग्रा मस्थ, शेतक-यांच्या व्यथा ऐकुन घेत सुसंवाद साधला. याप्रसंगी शिवसेना रामटेक माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, शिवसेना संपर्क प्रमुख सुधिर सुर्यवंशी, जिल्हा प्रमुख (ग्रा) राजु हरणे, उत्तम कापसे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम नवले, रामटेक विधानसभा संघट क प्रेम रोडेकर सह शिवसेना, युवासेना पदाधिकारी, संभाजी ब्रिगेड नागपुर जिल्हा (ग्रा) अध्यक्ष संजय कानतोडे, शांताराम जळते, रविंद्र ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राच्या राख तलावाची राख पेंच नदीत सोडुन सरळ नदी प्रदु र्शित करून नांदगाव च्या नागरिकांचे व शेतक-यांच्या  जनजीवनावर वाईट परिणाम होत, योग्य मोबदला न देता भंयकर समस्या निर्माण केल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्याने मी पर्यावरण मंत्री असताना (दि.१३) फेब्रुवारी नांदगाव राख तलावाची पाहणी करून वस्तु स्थिती खरच भयानक असल्याने राख तलाव त्वरित बंद करून तलावातील राख बाहेर काढुन प्रकल्प ग्रस्ताच्या व नागरिक, शेतक-यांच्या संपुर्ण समस्या सोडविण्याचे संबधित अधिका-यांना आदेश दिले होते. राख तलाव बंद करून त्यातील राख सुध्दा ७०% काढ ण्यात आली आहे. परंतु ग्रामस्थ, प्रकल्पग्रस्थ शेतक-यांच्या इतर समस्याही सोडवुन पुर्णत: न्याय मिळवुन देण्याकरिता मी कटिबंध्य असुन आपल्या सोबत अस ल्याचे युवासेना प्रमुख  आदित्य ठाकरे साहेब हया नी आपल्या भेटीत ग्रामस्थाना हमी दिली. तसेच परती ला कोळसा खदान चे व गुप्ता कोल वासरीच्या कोळ सा धुळीने वराडा, एंसबा च्या त्रस्त शेतक-यांच्या निवे दनाने कोल वासरी व बाजुच्या शेतीला धावती भेट दिली.
  या सुसंवाद कार्यक्रमात नांदगाव सरपंचा सोनाली मनोज वरखडे, उपसरपंच सेवक कृष्णाजी ठाकरे देवाजी ठाकरे, वराडा सरपंचा विद्याताई दिलीप चिखले, क्रिष्णा खिळेकर, रामभाऊ ठाकरे, धर्मेंद्र रच्छोरे, अजयसिंह राजगि-हे, रवि रच्छोरे, वनदेव वडे, किशोर ठाकरे, जागेश्वर पु-हे, गेंदलाल  रच्छोरे, संतोष उपाध्ये, निलेश गिरी, देवचंद चव्हाण, तुषार ठाकरे, दशरथ गिरी, रामकृष्ण शिंदेमेश्राम, आकाश ठाकरे, ललीत धानोले, राज ठाकरे, तेजराम खिळेकर, गोरले,   लताबाई ठाकरे, माया पु-हे, ज्यो ती ठाकरे, विजया वडे, अश्विनी ठाकरे सह नांदगाव, एंसबा, वराडा परिसरातील प्रकल्प ग्रस्त ग्रामस्थ, शेतकरी बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

सत्रापुर कन्हान येथे स्थागुअशा नागपुर ची जुगार अड्डयावर धाड..

Mon Aug 29 , 2022
–  २२ जुगार खेळणा-याना पकडुन तासपत्ते, १७ मोबाईल, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन सह २०,०१,२४५ रूपयाचा मुद्देमाल जप्त.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथे स्थानि क गुन्हे शाखा नागपुर ग्रामिण पोलीसांनी जुगार अड्ड यावर धाड मारून २२ जुगार खेळणा-याना ताब्यात घेऊन नगदी रूपये, १७ मोबाईल, एक चार चाकी व एक दुचाकी वाहन व जुगाराचे इतर साहित्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com