कामठीत तीन दिवसीय आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 1:- युवा क्रीडा मंडळाचे वतीने प्रभाग क्र 16 येथील छत्रपती नगर नवीन कामठी येथे आयोजित आमदार चषक ओपन गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन करण्यात आले . छत्रपती नगर नवीन कामठी येथे युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित आमदार चषक ओपन गट कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांचे हस्ते दीप प्रज्वलन व वीर बजरंग बलीच्या प्रतिमेची , क्रीडांगणाची पूजा व खेळाडूचा परिचय करून करण्यात आले. यावेळी माजी जी प सदस्य अनिल निधान,भाजप युवा मोर्चा राज्याचे पदाधिकारी संकेत बावनकुळे ,भाजप राज्य औद्योगिक आघाडीचे अजय अग्रवाल, शहर भाजप अध्यक्ष संजय कनोजिया , नगरसेवक लालसिंग यादव ,प्रतीक पडोळे ,विजेंद्र बोरकरे , श्रावण सावरकर ,उज्वल रायबोले, सुषमा शिलाम ,पिंकी वैद्य, एडवोकेट आशिष वंजारी, चंद्रकांत पडोळे उपस्थित होते कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार टेकचंद सावरकर म्हणाले ग्रामीण भागातील तरुण –  तरुणींनी विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन आपला व आपल्या गावाचा नाव लौकिक करण्याचे आव्हान केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक प्रतीक पडोळे यांनी केले संचालन प्रवीण आगाशे यांनी केले व आभार प्रदर्शन श्रावण सावरकर यांनी केले. तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेत 24 संघानी सहभाग नोंदविला आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com