नागपुर :- रात्री उशिरा झालेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील सर्व अंडरब्रिज गुडघाभर पाण्यात होते. कामठी रोडवरील उप्पलवाडी ब्रिज, मोमीनपुरा, गड्डीगोदाम चर्चजवळील मार्ग याहून भीषण आहे.
लोहा पुलाजवळ नुकत्याच बांधलेल्या नवीन अंडर ब्रिजचे हे दृश्य आहे. थोड्याशा पावसाने कल्व्हर्टमध्ये पाणी साचले आहे. लोकांच्या गाड्याही मध्येच थांबल्या आहेत. पाणी काढायला जागा नसल्याने पाणी साचले आहे. . थोड्या पावसात ही अवस्था. (छायाचित्र डॉ.प्रवीण डबली)