अवैध्य मोहाफुल रसायण साठयावर स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीणची कारवाई 

रामटेक :- स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पो.स्टे. रामटेक हद्दीतील उमरी शिवारात अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना मुखबीर कडुन मिळालेल्या माहिती वरून उमरी शिवारात मोहाफुल गावठी भट्टीवर रेड केली असता फरार आरोपी नामे- नितीन मोरेशिया रा. रामटेक जि. नागपूर या नावाचा इसम दगड विटाच्या चुलीवर अवैधरीत्या मोहफुल गावठी दारूची भट्टी तयार करून दारू गाळत असल्याबाबत गोपनिय बातमी मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण येथील स्टाफने नमुद्र घटनास्थळी अवैध मोहाफुल दारू भट्टीवर छापा मारून त्याचे ताब्यातुन १) १८०० हजार लीटर मोहफुल सडवा रसायन एकूण किमती अंदाजे १,८०,००० /- रु. २६० लिटर मोहाफुल दारू किमती ६०००/- रु ३) मोहफुल दारू गाळण्याचे इतर साहित्य किमती ३२०० /- रु असा एकूण १,८९,२०० /- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरूद पोलीस ठाणे रामटेक येथे कलम ६५ (ई) (क) (फ) (ब) सदाका कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त मुद्देमाल व कागदपत्रे पुढील कायदेशीर प्रक्रिये करीता पोलीस ठाणे रामटेक यांचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही ही पोलीस अभीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष ए. पोदार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ.  संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या सहायक पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, पोलीस हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे पोलीस नायक नितेश पिपोरटे, प्रमोद भोयर, विपीन गायधने, शंकर मडावी, उमेश फुलबेल यांचे पथकाने केली.

NewsToday24x7

Next Post

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ४ ट्रक आणि ०२ टिप्परवर कारवाई करून एकूण ०१ कोटी १९ लाख ३८००० रूपयाचा मुद्देमाल जप्त

Wed Sep 6 , 2023
– पोलीस स्टेशन रामटेकची कारवाई रामटेक :-पोलीस अधिक्षक नागपुर ग्रामीण यांचे आदेशाने परि. सहाय्यक पोलीस अधिक्षक अनिल मस्के सा प्रभारी पोलीस स्टेशन कुही, स्टॉफ सह नागपुर ग्रामीण जिल्हा पोस्टे रामटेक येथे पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन रामटेक हददिमध्ये पेट्रोलींग दरम्यान मुखबीरद्वारे मिळालेल्या माहितीवरून अवैधरित्या विनापरवाना रेतीची वाहतुक होत आहे. या माहिती वरून स्टाफसह तुमसर रामटेक बायपास हायवे रोडवर सनशाईन हॉटेल […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com