विद्यापीठाच्या शैक्षणिक सत्र 2022 -23 हिवाळी परीक्षेकरीता आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ

अमरावती :-   संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र 2022-23 करीता सर्व अभ्यासक्रमाला नियमित व माजी विद्याथ्र्यांचे हिवाळी 2022 करीता सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षांचे आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याबाबत वेळोवेळी कळविण्यात आले होते. तथापि, अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या विनंतीवरुन परीक्षा आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करण्याकरीता अंतिम संधी म्हणून (विलंब शुल्कासह) दिनांक 7 ते 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

या कालावधीत ज्या विद्याथ्यानी परीक्षा आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर केलेले नसतील, त्यांनी ऑनलाईन परीक्षा आवेदनपत्रे उपरोक्त कालावधीत सादर करावयाचे आहे. ऑनलाईन आवेदनपत्रांची व्हेरीफाईड लिस्ट दिनांक 14 नोव्हेंबर 2022 पर्यंत परीक्षा विभागातील संबंधित लिपिकांकडे सादर करावयाची असून याबाबत परीक्षा विभागाने सर्व संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य व शैक्षणिक विभागप्रमुख यांना पत्र पाठवून कळविले आहे.

विहित कालावधीनंतर कोणत्याही परिस्थितीत अथवा कारणास्तव परीक्षा आवेदनपत्रे स्वीकारल्या जाणार नाहीत, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या प्रभारी संचालक मोनाली तोटे पाटील यांनी विद्यापीठाच्यावतीने कळविले आहे. अधिक माहितीकरीता त्यांचेशी संपर्क साधता येईल.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ATTACHMENT OF PROBATIONERS OF MAHARASHTRA STATE  CIVIL SERVICE OFFICERS WITH ARMY 

Thu Nov 3 , 2022
Nagpur :- The Indian Army attachment of probationers of Maharashtra State Civil Service Officers from Vasantrao Naik State Agriculture Extension Management Training Institute (Vanamati) started at Brigade of The Guards, Regimental Centre, Kamptee from 30 October 2022. A total of 17 Probationers including six lady officers of Maharashtra State Civil Services are undergoing their army orientation training under the aegis […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com