कोळसा ट्रक ने पायदळी दोन इसमाना धडक मारल्याने एक मुत्यु तर एक जख्मी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – अण्णा मोड डुमरी येथुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्याकरिता जाणा-या ट्रकने पोलट्री फार्म कडे जाणा-या दोन पायदळी व्यकतीने जोरदार धडक मारल्याने रंजित डेहरिया चा घटनास्थळीच मुत्यु झाला तर रोहीत डेहरिया जख्मी झाला.
बुधवार (दि.१८) ला सायंकाळी ७ वाजता दरम्यान अणा मोड डुमरी वरून सामान घेऊन पायदळ येत असताना नांदगाव पोलट्री फाम जवळ डुमरी कडुन गोंडेगाव खुली कोळसा खदान ला कोळसा भरण्या करिता जाणा-या ट्रकने रोहीत केसरी डेहरिया वय २८ वर्ष व रंजित रामनारायण डेहरिया वय २२ वर्ष राह. सिमरिया जि सिवनी (म प्र) हल्ली मु नांदगाव पोलट्री फार्म हयाना मागुन जोरदार धडक मारल्याने रोहीत डेहरिया बाजुला फेकल्या गेला तर रंजित रामनारायण डेहरिया ट्रकट्या चक्यात आल्याने घटनास्थळी त्याचा मुत्यु झाला. तर रोहीत डेहरिया जख्मी झाला. ग्रामस्थानी कोळसाचे ट्रक काही वेळ थांबवुन वेकोलि गोंडेगाव खदान प्रशासनाने आरोपी ट्रक चालकास पकडुन मुतकास नुकसान भरपाई देऊन बेधुंद चालण्यावर प्रतिबंध लावण्याची मागणी करण्यात आली. घटस्थळी कन्हान पोलीस पोहचुन मुतदेह उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदना करिता पाठवुन पुढील तपास करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

'कॅन्सर स्क्रिनिंग प्रोग्रॅम'चे विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी केले उद्घाटन

Thu May 19 , 2022
 विभागात शंभर कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्प राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालय व इंडियन कॅन्सर सोसायटीचा पुढाकार गरीब व गरजू रुग्णांसाठी विशेष सुविधा                                                            नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर रुग्णालय आणि संशोधन केंद्र, इंडियन कॅन्सर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यांमध्ये कॅन्सर स्क्रिनिंग प्रोग्रॅम राबविला जाणार आहे. सावनेर तालुक्यातील चिंचोली येथे आज विभागीय आयुक्त तथा कॅन्सर रिलीफ सोसायटीच्या अध्यक्ष डॉ. माधवी खोडे- चवरे यांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com