९ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली, काही काळ त्यांच्यासाठी थांबू,मात्र विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल – जयंत पाटील

नागपुर/मुंबई :- अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार शरद पवार यांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांना धोक्याने तिथे नेले होते. ज्या ९ आमदारांनी शपथ घेतली ते आमदार वगळता तिथे गेलेल्या सर्वांना आमची दारे खुली आहेत. काही काळ आम्ही त्यांच्यासाठी थांबू, एका विशिष्ट कालावधीनंतर आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

येत्या ५ जुलै रोजी शरद पवार यांनी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बैठक बोलवली आहे. या बैठकीला सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील. या बैठकीला प्रचंड गर्दी होईल अशी खात्री व्यक्त करतानाच पवारसाहेबांसोबत असणारा, शरद पवार यांना पाठिंबा देणारा प्रत्येक वर्ग तिथे सहभागी असेल असे स्पष्ट केले.

आम्हाला काँग्रेसशी कोणताही संघर्ष करायचा नाही. ९ आमदार सोडले तर सर्व आमदार अद्याप आमच्यासोबत आहेत. विधानसभा अध्यक्ष संख्याबळानुसार निर्णय घेतील. यासाठी काही दिवस थांबावे लागेल असेही जयंत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना सांगितले.

ज्याक्षणी ९ आमदारांनी शपथ घेतली त्याचक्षणी ते अपात्र ठरत आहेत. विधानसभा अध्यक्षांना आम्ही तसे पत्र दिले आहे. त्यांचीशी बोलणेही झाले आहे. ते लवकरच निर्णय घेतील अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ

Mon Jul 3 , 2023
नागपूर :- जिल्हास्तरीय राष्ट्रीय सिकलसेल अभियानाचा शुभारंभ डागा स्मृती शासकीय रुग्णालयात करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॅा. मिलिंद माने यांची उपस्थित होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. अख्तर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रवीण नवखरे, स्त्री रोग तज्ञ डॉ. मुल, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. पांडे, दिशा ह्युमन वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष वामन सोमकुवर, जिल्हा सिकलसेल समन्वयक प्राजक्ता चौधरी, सिकलसेल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com