लोडशेडिंगमुळे त्रस्त नागरिकांना घेऊन जि प सदस्य प्रा-अवंतिका लेकुरवाळे धडकल्या मौदा महावितरण कार्यालयावर

संदीप कांबळे, कामठी

कामठी ता प्र 15: – मागील आठवड्यापासून काही गावांमध्ये तीन-तीन वेळा लोडशेडिंग यामुळे नागरिक त्रस्त झाले होते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी उपकार्यकारी अधिकारी महावितरण टेंभुर्ने यांच्या कार्यालयांवर सत्ता पक्ष नेता तथा सदस्य जि.प. नागपुर प्रा अवंतिका लेकुरवाडे यांच्या नेतृत्वात व कामठी पंचायत समिती उपसभापती-आशिष मल्लेवार ,सदस्य दिलीप वंजारी यांच्यासमवेत निंबा, शिवनी, वरंभा, आसलवाडा, केसोरी, इत्यादी गावातील नागरिकांसह महावितरण कार्यालयावर धडक दिली. अधिकाऱ्यांशी चर्चा केली व सोमवारपासून नियमित भार नियमन करून अतिरिक्त त्रास कमी करण्याचे आश्वासन टेंभुर्ने यांनी दिले. याप्रसंगी वडोदा बीडगाव सर्कल मधील सरपंच उपसरपंच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. तसेच महावितरणचे वैद्य , जेई तितरमारे , जाधव , सोळुंके उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठीत भीमजयंतीचा जल्लोष, भव्य मिरवणूक

Fri Apr 15 , 2022
संदीप कांबळे,कामठी कामठी ता प्र 15: – कोरोना संकट निवारल्याने दोन वर्षानंतर कामठी तालुक्यात सर्वत्र 14 एप्रिल ला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचा उत्साह ओसंडून वाहत होता.मोठ्या उत्साहात भीमजयंती साजरी करण्यात आली तसेच दरवर्षीप्रमाणे यावर्षी काढलेल्या भीमजयंती मिरवणूकित हजारोच्या वरील अनुयायांचा सहभाग होता तर दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीचा स्वागत करत असलेले सांगोडकर कुटुंबीयांतर्फे 131 किलो चा केक कापून मिरवणुकीतील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com