राज्यव्यापी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या‎ बेमुदत संपात पोरवाल महाविद्यालयातील…

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सहभाग

कामठी ता प्र 22 :- राज्यातील महाविद्यालयीन आणि‎ विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी‎ विविध मागण्यांसाठी साेमवार २०‎ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला‎ आहे. कामठी येथील सेठ केसरीमल पोरवाल विविध‎ महाविद्यालयातील कर्मचारी विविध‎या संपात‎ सहभागी झाले आहेत. कर्मचाऱ्यांचे‎ म्हणणे आहे की, विद्यापीठ आणि‎ महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती‎ समितीच्या वतीने प्रलंबित‎ मागण्यासाठी अनेकदा प्रशासनाकडे‎ निवेदन देण्यात आले.‎ याबाबत अनेक बैठका होऊनही‎ मागण्यांबाबत सकारात्मक विचार‎ करण्यात येईल असे केवळ‎ आश्वासन देखील देण्यात आले.

मात्र‎ प्रत्यक्षात मागण्या मान्य होत नसल्याचे‎ कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.‎ सन १९९४ पासून सुरू असणारी आश्वासित प्रगत योजना ७ डिसेंबर २०१८ रोजी शासनाने आध्यादेश काढून रद्द केलेली आहे. ती योजना इतर सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे. परंतु फक्त महाविदयालीन व विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचारी यांची चालू असलेली आश्वासित प्रगत योजना पुन्हा चालू झाली पाहिजे.प्रत्येक महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ५० ते ६० टक्के पदे रिक्त आहेत, ती त्वरीत भरावीत. नोव्हेंबर २००५ नंतर सेवत रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेशन योजना लागू करावी.

सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित‎ प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन‎ निर्णय पुनर्जिवीत करून सुधारित सेवा‎ अंतर्गत आश्वासित प्रगती योजना‎ पूर्ववत लागू करावी. सातव्या वेतन‎ आयोगातील तरतुदीनुसार १०-२०-३०‎ वर्षानंतरच्या लाभाची योजना‎ विद्यापीठीय व महाविद्यालयीन‎ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना लागू करणे,‎ सातव्या वेतन आयोगापासून वंचित‎ असलेल्या १४१० विद्यापीठीय‎ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन‎ आयोग लागू करून विद्यापीठीय व‎ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर‎ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते‎ प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या‎ कालावधीतील वेतनाच्या फरकाची‎ थकबाकी अदा करण्यात यावी, आदी‎ विविध मागण्या महाराष्ट्र राज्य‎ विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक‎ संयुक्त कृती समितीने केल्या आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com