बावनकुळेच्या कार्यक्षेत्रातील कामठीचा निवडणूक विभाग वाऱ्यावर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-संवेदनशील असलेल्या निवडणूक विभागाचा कारभार खाजगी कर्मचाऱ्यांच्या हाती

कामठी :- नागपूर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व ऊर्जामंत्री तसेच विधानपरिषद सदस्य आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामठी तहसील कार्यालयात निवडणूक विभाग हा रामभरोसे असून निवडणूक विभागाचा कारभारात भोंगळ कारभार सुरू आहे.नुकतेच 18 डिसेंबरला कामठी तालुक्यातील 27 ग्रा प ची निवडणूक पार पडली असून या निवडणुक दरम्यान निवडणुकीच्या पूर्वसकाळी कामठी तहसील कार्यालयात कार्यरत एका गृहरक्षकाचा अस्थीव्यंगाचा झटका येऊन मृत्युमुखी पडल्याची घटना घडली तर या निवडणुकीत कित्येकच चुकावर गप्प राहून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप ‘अशी भूमिका वर्तविण्यात आली.तर निवडणूक विभाग हे संवेदनशील विभाग असूनही या विभागाचा कारभार हा वाऱ्यावर आहे यावर कुणाचेही नियंत्रन नसल्याचा भोंगळ कारभार सुरू आहे.

कामठी तहसील कार्यालयांच्या निवडणूक विभागात शिस्तबद्ध भूमिकेत कार्यरत असलेले वरिष्ठ लिपीक सत्यजित चंद्रिकापुरे यांना मागील आमदार बावनकुळेच्या जनसंवाद बैठकीत झालेल्या टिकाना अनुसरून बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशावरून चंद्रिकापुरे यांना त्या विभागातुन काढले असून त्यांची बदली सुद्धा झाली आहे मात्र त्यांच्या रिक्त ठिकाणचा कारभार हा कुण्या अनुभवी कर्मचाऱ्यांना न देता निकर्तव्यदक्ष कर्मचारी कनिष्ठ लिपिक नितीन टेम्भुर्णीकर यांच्या हाती सोपविण्यात आला मात्र या कर्मचाऱ्याला या निवडणूक विभागाशी संबंधित कामाचा कुठलाही अनुभव नसून आळशी आणि कामचुकार स्वभावाचा धनी असल्याने कामात कुठलाही राम दिसुन येत नाही .नुसते बावन बावन सुरू असते तर दुसरीकडे निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार ऐन ग्रा प निवडणुकीच्या तोंडावर सेवानिवृत्त झाल्याने परीक्षाविधीन नायब तहसीलदारला हा पदभार देण्यात आला मात्र यांनाही कामाचा अनुभव नसल्याने या संवेदनशील विभागाशी सबंधित काम हे वाऱ्यावर केल्यासारखे करण्यात येत आहेत.नुकत्याच तीन टप्प्यात झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीचा निकाल हा सायंकाळी 5 च्या आत लागून गेला. कित्येक ठिकाणी अविरोध निवडणुका पार पडल्या मात्र रात्रीचे नऊ वाजूनही या निवडणूक विभागाकडे निवडणुकीची अपडेट माहिती उपलब्ध नव्हती याची शोकांतिका व्यक्त करण्यात येत होती.

…निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार कार्यालयाला बहुधा कुलूपबंद असून निवडणूक विभागाशी संबंधित कामे पाहणारे प्रमुख कारकूनची खुर्ची ही नेहमीच निरंक राहत असून या खुर्चीचा कुणी वाली तरी आहे का?असा प्रश्न उपस्थित होत आहे तर या संवेदनशील विभागाशी निगडित गोपनीय कामे हे कामठी रहिवासी खाजगी तरुणांच्या हातून पार पडत आहेत.या कार्यालयात कामे पार पाडण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर संगणक चालकची नियुक्ती करण्यात आली असून कार्यरत असलेले संगणक चालक राजकीय पक्षाशी संबंधित असून कामठीवासी आहेत.मिळत असलेल्या मानधनाच्या आधारावर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलें तरी निवडणूक विभागाचा पूर्ण लेखाजोखा या संगणक चालकाच्या अखत्यारीत पार पडत आहे तेव्हा या तहसील कार्यालयाचा निवडणूक विभाग किती शिस्तबद्ध आहे आणि कार्यालयात किती प्रामाणिकतेने कामे पार पडतात हे दिसुन येते.

या कार्यलयातील कार्यरत कर्मचाऱ्याच्या चुकांमुळे कित्येक मतदारांचे नावात घोळ झालेला असून कित्येक मतदार अजूनही अपेक्षित समाधानी नाही त्यातच कित्येक लोकप्रतिनिधी सह जागरूक नागरिक न्यायीक हक्कासाठी न्यायालयीन पायरी चढले आहेत मात्र निवडणूक विभागाच्या मनमानी कारभारामुळे येथील लोकप्रतिनिधी तसेच जागरूक नागरिकांची कुचंबणा होत आहे तेव्हा कामठी मतदार संघात योगायोगाने चंद्रशेखर बावनकुळे व टेकचंद सावरकर सारखे दोन आमदार आहेत आणि अश्या कर्तव्यदक्ष आमदारांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कामठीच्या निवडणूक विभागात असलेल्या या मनमानी कारभारावर अंकुश लागणार का?असा प्रश्न येथील जागरूक नागरिक करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन, स्वागत

Thu Jan 19 , 2023
मुंबई :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या भेटीसाठी मुंबई येथे आगमन झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. पंतप्रधानांच्या हस्ते मेट्रो मार्गिका २ अ (दहिसर पूर्व ते डी एन नगर) व मेट्रो मार्गिका ७ (अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व) चे उदघाटन करण्यात येणार असून बृहन्मुंबई मनपाच्या २० नवीन हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com