निवडणुकीमुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच अंगणवाडीला 20 व 21 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर

भंडारा : जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया निश्चित केलेल्या मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व मतदान साहित्यासह मतदान पथके 20 डिसेंबर रोजी पोहोचतील. दिनांक 21 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सायंकाळी साडेपाच नंतर रात्री उशिरापर्यंत सर्व साहित्यासह परत येणार आहेत. मतदान केंद्राचे ठिकाण हे शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच अंगणवाडी येथील इमारतीमध्ये आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी शाळा व कॉलेज तसेच अंगणवाडी यांना दिनांक 20 व 21 डिसेंबर रोजी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

केळवद येथे चार दुकानात चोरी, पोलीसांच्या राञ कालीन गस्तावर प्रश्नचिन्ह

Wed Dec 15 , 2021
  व्यावसांयीकांच्या मालमत्ता रामभरोसे केळवद – येथिल मुख्य बाजार पेठेतील ता.१४ ला मध्यराञी एक नव्हे तर चक्क चार दुकानांची शटर फोडुन लाखो रुपयांची रौख सह ,सीसीटीव्ही कॅमेर्‍याची डी.व्ही.आर मशीन आणी दुकानातील कीराणा साहीत्यवर हाथ साफ केला,येथिल पोलीस स्टेशनच्या हाकेवर असणार्‍या येथिल बाजार पेठेतील चक्क चार दुकाने चोरटयानी फोडल्याने,केळवद पोलीस राञीला कीती सर्तक आणी कर्तव्यनिष्ट असते हे घडलेल्या प्रकरणातुन पहावयास मिळत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com