छत्रपती संभाजीनगर :- ज्येष्ठस्वातंत्र्य सेनानी विमल देशपांडे या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी येत असतांना त्यांना तेथेच बसू द्या; मीच येऊन भेटतो असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः त्यांच्यापर्यंत गर्दितून वाट काढत पोहोचले व त्यांची आस्थेने विचारपुस केली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या ज्येष्ठांप्रती असलेल्या आदरभावाचे दर्शन उपस्थितांना झाले. मुख्य शासकीय सोहळ्यात ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोहळ्यास उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांना भेटण्यासाठी गेले. तेथे भेटत असतांना समोरुन 90 हून अधिक वर्षे वय असणाऱ्या विमल देशपांडे या त्यांना भेटण्यासाठी येत असतांना मुख्यमंत्र्यांना दिसल्या. त्यांना वयोमानामुळे गर्दीतून वाट काढणे शक्य होत नव्हते. त्यांची अवस्था पाहून मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितले की, त्यांना तेथेच बसू द्या, मीच तेथे येतो. असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशपांडे यांच्या पर्यंत पोहोचले आणि त्यांची विचारपूस केली.
Next Post
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 73 व्या वाढदिवसानिमित्त राज्यात “नमो 11 कलमी कार्यक्रम” राबविणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
Mon Sep 18 , 2023
· महिला सशक्तीकरण अभियानातून 73 लाख महिलांना शासकीय योजनांचा लाभ · नमो कामगार कल्याण अभियानातून 73 हजार बांधकाम कामगारांना सुरक्षा संच · नमो शेततळी अभियानातून 73 हजार शेततळयांची उभारणी · नमो आत्मनिर्भर व सौर ऊर्जा गाव अभियानातून 73 गावे आत्मनिर्भर करणार · नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियानातुन वस्यांमिचा सर्वांगिण विकास करणार · नमो ग्राम सचिवालय अभियानातून प्रत्येक जिल्ह्यात 73 […]

You May Like
-
March 24, 2023
राष्ट्रबोध हेच राष्ट्रीय चेतनेचे प्रमाण : डॉ.श्रीराम परिहार
-
September 1, 2023
Union Bank of India is organizing U-Genius Quiz competition for schools
-
May 8, 2023
कामठीत गुन्हेगारीचा ग्राफ वाढतोय
-
October 10, 2022
ARMY OPENS SITABULDI FORT.