अमरदिप बडगे, प्रतिनिधी
गोंदिया : डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सोशिअल फोरम तिरोडा वतिने आदर्श शिक्षक म्हणून तिरोडा तालुक्यातुन शिक्षक विजय आर खोब्रागडे व दांपत्याचा सत्कार प्रा. रंजीत काणेकर याच्या अध्यक्षतेखाली मनोज वासनिक त्याच्या हस्ते त्याच्या स्वगृही तिरोडा येथे करण्यात आले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून रामविलास बोरकर प्रा.के.एफ. मेश्राम प्रदिपकुमार मेश्राम, प्रा. दिवाकर गेडाम, टी एम वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी याच्या ऊपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . विजय खोब्रागडे हे भिवरामजी विद्यालय वडेगांव येथे सहा शिक्षक असतानी राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत नेतृत्व केले. दोनदा जिल्हा स्तरीय तर माध्यमिक शिक्षक गटातून दोनदा जिल्हा स्तरीय नेतृत्व केले.
त्यानी ऊच्च शिक्षण घेऊन आपल्या ज्ञानात भर घातली व त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासासाठी करून घेतात असे मत मनोज वासनिक यांनी व्यक्त केले तर रंजित कानेकर व रामविलास बोरकर यांनी खोब्रागडे दाम्पत्यांनी कुटुंब सुसंस्कृत करुन मुलगा सौरभ खोब्रागडे, व मुलगी आकांक्षा खोब्रागडे दोन्ही मुलांना एम बि.बि.एस ला पात्र केले. या शैक्षणिक कार्याचे गुणगौरव केले . कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रदिप मेश्राम यांनी केले. तालुक्यातील विजय खोब्रागडे सर यांना पत्रकारितेचा पुरस्कार तसेच सेवानिवृत्ती दोघांचे अभिनंदन केले.