रेल्वे कर्मचाऱ्याची 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 27 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या गांधीनगर ,कसाईपुरा कामठी रहिवासी व रेल्वे विभागात कार्यरत कर्मचाऱ्याची एसबीआय क्रेडिट कार्ड वरून 70 हजार 84 रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना 25 मार्च ला घडली असून यासंदर्भात फिर्यादी तानाजी बागडे ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार सदर फिर्यादी ने एक महिन्यापूर्वीच क्रेडिट कार्ड सेवा सुरू केली असता घटनेच्या दिवशी फिर्यादीला एका अनोळखी मोबाईल कॉल वरून फोन आला असता एसबीआय क्रेडीट कार्ड कडून बोलत असल्याचे सांगून रिफंड साठी क्रेडीट कार्ड ची डिटेल्स घेऊन एसबीआय क्रेडिट कार्ड मधून 70 हजार 84 रुपयाची आर्थिक फसवणूक केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यु..

Mon Mar 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 27:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खापरखेडा बाह्य वळण मार्गावर पाण्याच्या शोधात भटकंती करीत असता रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हरणाचा जागीच अपघाती मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 10 दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलीस तसेच फॉरेस्ट विभागाचे अधिकाऱ्यांनी सदर हरणाचा मृतदेह ताब्यात घेऊन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com