गडचिरोली :- सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समितीची सभा 07 फेब्रुवारी 2025 रोजी (शुक्रवार) ला सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे.
तरी, भ्रष्टाचारासंदर्भात जनतेच्या काही तक्रारी असल्यास, त्या तक्रारकर्त्यांनी आवश्यक पुराव्यांसह सभेच्या दिवशी विहित वेळेवर उपस्थित राहुन सादर करावे. असे सदस्य सचिव, जिल्हा भ्रष्टाचार निमुर्लन समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.