नायलॉन मंजाविरूद्ध जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर

नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश

नागपूर दि. 8 : प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या विक्री व वापराविरूद्ध जिल्हा प्रशासन अँक्शन मोडवर आले असून नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

जिल्ह्यात महानगरपालीका क्षेत्रात झोननिहाय तसेच नगरपालीका क्षेत्र व ग्रामीण भागात देखील टास्क फोर्स समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी संबंधीत पोलीस ठाणेदार यांच्या समवेत नायलॉन मांजा विक्री होत असलेल्या तसेच नॉयलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांविरूद्ध तत्काळ गुन्हे नोंदवून कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

नायलॉन मांजाच्या वापराविरूद्ध कारवाईचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृह येथे आज बैठक घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलिस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, महानगरपातिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, शिक्षणाधिकारी (माध्यमीक) रवींद्र काटोलकर, नगरपालीका प्रशासन अधिकारी अतुल पंत तसेच इरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांनी परराज्यातून येणाऱ्या नायलॉन मांजावर आळा घालण्यासाठी पोलिस चेकपास्ट ॲक्टीव्ह करण्याचे तसेच सायबर सेलने ऑनलाईन मांजा विक्रीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. ज्या भागात पतंग जास्त प्रमाणात उडविल्या जाते, अशा भागात विशेक्ष लक्ष ठेवण्याचे तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी नायलॉन मांजाविरोधात सामाजिक माध्यमांद्वारे जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले.

‘मी पतंग उडवितांना नायलॉन मांजा वापरणार नाही, आणि इतर कोणालाही नायलॉन मांजा वापरू देणार नाही’, या आशयाची प्रतिज्ञा सर्व शासकीय व खाजगी शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मकरसंक्रातपर्यंत रोज घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. यासोबत पालकांनो, आपला पाल्य पतंग उडवतांना कोणता मांजा वापरतो आहे, याकडे लक्ष ठेवण्याचे व नायलॉन मांजा वापरल्यास कारवाई होऊ शकते अशी समज आपल्या पाल्यांना देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी पालकांना केले आहे.

नायलॉन मांजा बाबत तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापण्यात आला आहे. नागरिकांना 0712-2562668 किंवा टोल फ्री क्रमांक 1077 यावर तसेच जवळच्या महानगरपालिका झोन कार्यालय, तहसिल कार्यालय, नगरपिरषद, नगरपंचायत, पंचायत समिती कार्यालय येथे देखील नायलॉन मांजाबाबत तक्रारी दाखल करता येतील.

यावेळी नगरपालीका प्रशासन अधिकारी अतुल पंत यांनी वाडी, काटोल, वानाडोंगरी, बुटीबोरी, हिंगणा तसेच कन्हाण नगरपालीका क्षेत्रात नायलॉन मांजाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे तसेच काटोल, मोहपा व नरखेड येथून एकूण 40 किलो नायलॉन मांजा जप्त केल्याची माहिती दिली.

बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उ.भ.भादुले, क्षेत्र अधिकारी म.रे.भिवापुरकर, विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र वानखेडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोधारी, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, शिक्षण विभागाचे सुशील बनसोड, कॅप्टन संजय खंदारे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मा.आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त दात्यांचे रक्तदान

Sun Jan 8 , 2023
नितीन लिल्हारे, प्रतिनिधी मोहाडी (सालई खुर्द) : सेवेत व्रत सातत्याने जपणारे विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विकास फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात शेकडो नागरिकांनी रक्तदान केले. रक्ताची अत्यंत निकड असताना झालेले हे रक्तदान अनेकांचे प्राण वाचविण्यास हातभार लावणार आहे. रुग्णाला वेळीच रक्त मिळाले तर अनेकांचे जीव वाचते. या संल्पनेतून माजी आमदार चरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com