माझी वसुंधरा अभियान अंतर्गत रोपटे वितरण,! “हरित-वाडी साठी आम्ही तयार”

वाडी :- स्वच्छ वाडी-सुंदर वाडी करण्यासाठी नगर परिषद अंतर्गत स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून आता “हरित-वाडी” साठी नागरिकांना झाडांची रोपटे वितरीत करून झाडे लावा-झाडे जगवा मोहीम राबविण्यात येत आहे.

वाडी क्षेत्रातील नागरिकांनी आपापल्या घरी व परिसरात वृक्षारोपण करून संपूर्ण वाडी परिसर हरित करावा यासाठी वाडी नप. चे मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी झाडे लावा-झाडे जगवा ही मोहीम सुरू केली असून यामध्ये नागरिकांना रोपटे वितरीत करून वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या वृक्ष वितरण समारंभात वाडी नप. च्या स्वच्छता अधिकारी सुषमा भालेकर, स्वच्छता निरीक्षक धनंजय गोतमारे, भीमराव जासुतकर यांच्या उपस्थितीत वाडी नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण अभियानचे ब्रॅण्ड एम्बेसिडर नरेशकुमार चव्हाण यांच्या हस्ते रोपट्यांचे वितरण करण्यात आले.यावेळी उपस्थित सर्व स्वच्छता कर्मचारी व नागरिकांना वृक्ष लागवडीचे महत्व पटवून पर्यावरनाचा समतोल राखण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्युत अभियंता नंदन गेडाम, शहर समन्वयक पिंकेश चकोले, नानाभाऊ चव्हाण, अजय देशमुख, महेश वानखेडे, इंद्रजीत इरपाती, आनंद शेंडे, धनंजय कळसे, विलास वानखेडे, प्रवीण नांदूरकर इत्यादीनी सहकार्य केले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गादा गावात दहा दिवसीय सार्वजनिक शारदा उत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ..

Sat Oct 29 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 29:- विद्यार्थी नवयुवक बहुउद्देशीय मंडळ गादा तफै दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील 30व्या वर्षी दिवाळीच्या निमित्ताने गावातील नवयुवकाना एकत्रितपणे येणाच्या व विधार्थयाचा कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आयोजित दहा दिवसीय सार्वजनिक शारदा उत्सव कार्यक्रमाचा 22 ऑक्टोबरला शुभारंभ करण्यात आला असून कार्यक्रम उत्साहात साजरा होत आहे.. तर उद्या 30 ऑक्टोबर ला सायंकाळी 7 वाजता सप्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com